डॉ.ए.ए.कादरी मानसिक आरोग्य केंद्रातर्फे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह उत्साहात साजरा

 0
डॉ.ए.ए.कादरी मानसिक आरोग्य केंद्रातर्फे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह उत्साहात साजरा

डॉ. ए. ए. कादरी मानसिक आरोग्य केंद्रातर्फे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2024 उत्साहात साजरा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2024 साजरा करण्यासाठी संपूर्ण जग एकत्र येत असताना, डाॅ. ए. ए. कादरी मानसिक आरोग्य केंद्राने मानसिक आरोग्याबद्दल जागरुकता वाढवण्यासाठण पुढाकार घेतला आहे. यावर्षीच्या "कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे" या ब्रीदवाक्याखाली जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जगभरातील सर्व समुदायांना महत्त्वपूर्ण संदेश दिला जात आहे.

बरेच विद्‌यार्थी व प्रौढ व्यक्ती आपल्या दैनंदिन कामकाजात जास्त वेळ घालवतात, त्यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर याचा कसा परिणाम होतो हे समजून येत नाही. व तो परिणाम ओळखणे फार महत्वाचे आहे. डॉ. ए. ए. कादरी मानसिक आरोग्य केंद्र प्रत्येकासाठी मानसिक दृष्ट्या आरोग्यदायी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. 

विशेष करून विद्यार्थी, शिक्षक, रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी व इतर सर्व क्षेत्रातील कर्मचारी या सर्वासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत.

 व्यक्तींसमोरील आव्हाने व सर्वांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण सर्वांनी समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठण पाऊले उचलणे महत्वाचे आहे.

समाजामध्ये जागरुकता वाढविण्यासाठी डॉ. ए.ए. कादरी मानसिक आरोग्य केंद्रातफे विवीध शालेय व महाविद्यालयीन तसेच समाजातील विवीध क्षेत्रातीळ प्रौढ व्यक्तींसाठी विवीध स्पर्धाची मालिका आयोजित करून समाजातील विवीध घटकांना या कार्यात सामावून घेण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन केले होते.

यामध्ये 23 सप्टेंबर ला वाद‌विवाद स्पर्धा, 24 सप्टेंबर ला पोस्टर सादरीकरण स्पर्धा, 25 सप्टेंबर ला नाट्य स्पर्धा 26 सप्टेंबर ला वक्तृत्व स्पर्धा तसेच प्रौढांसाठी वक्तृत्व स्पर्धा 27 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला. केवळ स्पर्धा म्हणून नव्हे तर आत्मचिंतन मानसिकरित्या ताजेतवाने आणि महत्वाच्या मानसिक आरोग्याशी संबंधीत विष‌यांवर मुक्तपणे संवादाची संधी म्हणून या स्पर्धात ते सहभागी झाले.

या कार्यक्रमाची तसेच विवीध स्पर्धाची सांगता दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी संत एकनाथ रंगमंदीर उस्मानपूरा येथे बक्षिस वितरण समारंभ व एका विशेष कार्यक्रम नायब शो ने करण्यात आली. या कार्यक्रमात प्रसि‌द्ध कवयित्री 'नायाब मिधा' यांनी प्रेक्षकांचे तसेच उपस्थित मान्यवरांचे एक आशेचा संदेश देऊन मनोरंजन केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी मा. दिलीप स्वामी तसेच प्रमुख उपस्थितीत आरोग्य विभागाचे उपसंचालक मा. डा. भूषण‌कुमार रामटेके, जिल्हा रुग्णालयाचे विभागप्रमुख प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ. जितेंद्र डोंगरे, सी आय एस एफ चे चीफ पवनकुमार, दामिनी पथकाच्या प्रमुख श्रीमती कंचन मिरधे, डॉ आदित्य येळीकर, डॉ. अमित चोरडीया, डॉ. हसीब फारुकी, डॉ. एहसान शेख या मान्यवरांची उपस्थिती होती. 

या कार्यक्रमात विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली, याशिवाय महाविद्‌यालयीन स्तरावर डिबेट कॉम्पिटीशनही घेण्यात आले. 

प्रथम पारितोषिक सफूरा खान (सरोश ज्युनि.काँलेज) द्वितीय तुबा जोहेब खुसरो (मौलाना आजाद कॉलेज) आणि डिबेट मध्ये प्रथम शिरिन पठाण, द्वितीय खान मुनेझा, तृतीय सय्यदा नसरा, तसेच पोस्टर मेकींग मध्ये प्रथम गौरी गणेश कांबळे (ब्लुमिंग बर्ड्स स्कूल), द्वितीय शुद्धी जाजु, तृतीय सय्यदा उमामा, ड्रॉमा कोम्पिटिशनमध्ये शालेय स्तरावर प्रथम सरोश स्कुल, द्वितीय ब्लू‌मिंग बर्ड्स स्कूल, तृतीय वाईस स्कूल तसेच महाविद्यालयीन स्तरावर प्रथम एम आय टी नर्सिंग कॉलेज, द्वितीय एम पी लॉ कॉलेज, तृतीय मौलाना आझाद कॉलेज, इलोक्यूशन कॉम्पिटीशन मध्ये प्रथम सिरत खतिजा, द्वितीय रकिबा तमीम, तृतीय सय्यदा लायबा यांना पारितोषिके देण्यात आले. 

तर प्रौढांच्या वक्तृत्व स्पर्धेत डेव्हिड चक्रनारायण यांनी प्रथम पुरस्कार पटकावला. 

या कार्यक्रमाचे आयोजन मानसिक आरोग्य केंद्राचे संचालक डॉ. अजीज अहमद कादरी, डॉ. मेराज कादरी श्रीमती अंजूम कादरी, सना कादरी यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सय्यद जफर, मोहम्मद नजीर, अशफहान सिद्‌दीकी, विजय सोनोने तसेच टीम बियाँडचे अनस देशमुख, अकिब खान शाहिद कासमी व मानसिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी परिश्रम

घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow