डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय दलित कोब्रा संघटनेच्या वतीने रॅली
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.6(डि-24 न्यूज) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शुक्रवारी सकाळी रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला दिन दुबळ्यांचे कैवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय दलित कोब्रा संघटनेच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी संघटनेचे रोकडिया हनुमान कॉलनी चौकातील विभागीय कार्यालय ते भडकल गेट पर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी तेथे अशोक दादा बोर्डे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या रॅलीमध्ये संघटनेचे युवा नेते आनंद बोर्डे, सागर बोर्डे, जितेंद्र कुंटे, संदीप मस्के, शांतीलाल मलिका बाजी, गायकवाड जयश्री, मुदीराज, सुनिता, चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. संघटनेच्या वतीने आज संघटनेच्या विभागीय कार्यालयासमोर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला.
What's Your Reaction?






