ढोल ताशे खरेदीसाठी गर्दी... पैठणगेट येथे अनेक वर्षांपासून परंपरागत व्यवसाय
 
                                ढोल ताशे खरेदीसाठी गर्दी... पैठणगेट येथे अनेक वर्षांपासून परंपरागत व्यवसाय
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) श्री गणेशाचे धुमधडाक्यात मंगळवारी आगमन होणार आहे. गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. बाजारपेठत श्री गणेश मुर्ती व साहित्य खरेदीसाठी गर्दी वाढली आहे पैठणगेट येथेही ढोल खरेदीसाठी गर्दी आहे. दिल्ली ढोलवालाचे मालक शेख वसीम यांच्याशी डि-24 न्यूजने संपर्क केला असता त्यांनी सांगितले ढोल बणवण्याचा आमचा मागिल 60 वर्षांपासून परंपरागत व्यवसाय आहे. सर्वात जुने आणि चांगल्या प्रतीचे साहित्य ढोल बनवण्यासाठी वापरत असल्याने राज्यातील विविध शहरातून ढोल खरीदीसाठी ग्राहक येतात. अगोदर आजोबा नंतर माझे वडील आणि आता मी अशी तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे. गणेशोत्सवानिमित्त सध्या गर्दी वाढलेली आहे. पुणे, मुंबई, नांदेड, परभणी, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर व जिल्ह्यातील सर्व शहरांमधून ढोल बणवण्याची ऑर्डर सुरु असते. विविध सण उत्सव व जयंतीनिमित्त आमच्याकडे ढोल बणवण्यासाठी कच्चे साहित्य दिल्ली, गुजरात व मुंबई येथून आणले जाते. गणेशोत्सवानिमित्त दोन तीन महिन्यांपूर्वी तयारी करावी लागते.
सध्या पुणेरी ढोलची मागणी जास्त आहे. पुणेरी ढोल 2500 रुपये, जम्बो ढोल 1500, लेडीज ढोल 1200, दबंग ढोल 4000, बजरंगी ढोल 10,000, नगाडा 6000, राजारानी ताशा 1400, साधा ताशा 1200 असे ढोल ताशांचे दर असल्याचे त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            