तर देशात अराजकता निर्माण होईल...? मुस्लिम, ख्रिश्चन, जैन धर्म टार्गेट- अॅड प्रकाश आंबेडकर
तर देशात अराजकता निर्माण होणार...? मुस्लिम, ख्रिश्चन,जैन धर्म टार्गेट - अॅड प्रकाश आंबेडकर
धर्माच्या आधारावर औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा निर्णय सरकारने घेतला अगोदर इतिहास बघायला हवे होते अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.
औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज)
देशात दिवाळीनंतर मणिपूर व गोध्रा सारखी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. काही बोटावर मोजण्या इतके समाजकंटक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्या वक्तव्याला देशातील जनतेने उत्तर न देता लोकसभेचे मतदान होईपर्यंत शांतता राखावी. मी अगोदरच मागणी केली आहे देशातील प्रमुख हिंदू मंदिरांना सेनेने सुरक्षा द्यावी. केंद्र सरकारचे विदेशी धोरण वेगळ्या दिशेने जात आहे. कॅनडातील घटनेवर टिका करत कॅनडात भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्यांची सुरक्षा व परिस्थिती बघून विदेशी धोरण आखले पाहिजे. असे खळबळजनक विधान पत्रकार परिषदेत वंचितचे सर्वेसर्वा एड प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
त्यांनी पुढे सांगितले लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सरकारी यंत्रणांचा वापर वाढणार आहे. मुस्लिम व ख्रिश्चन समाज टार्गेट होते आता जैन समाज सुध्दा टार्गेट होणार आहे. जैन समाज हा शाकाहारी समाज आहे यामध्ये शंका नाही. प्रामाणिक समाज आहे पण त्यांचे व्यापार मांसाहारी आहे यामुळे त्यांना टार्गेट केले जाईल अशी भीतीही आंबेडकर यांनी व्यक्त केली. निवडणूक येईपर्यंत मोदींची 56 इंच छाती 20 इंच होईल अशी टिका आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
ओबीसी, मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर परिस्थिती विस्फोटक बनवण्याचा प्रयत्न केला जाईल म्हणून समाजाने एकजूट दाखवत समाजात तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कृती करु नये. मराठा समाजाला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जाऊ शकते म्हणून तोडगा काढण्यासाठी जातीपातीचे राजकारणात न करता वंचितच्या हातात सत्ता द्या असे आवाहन केले. जातीयवाद,धर्मवाद नसला तर प्रांतवाद हि राहणार नाही अशा राजकारणाची आज गरज आहे.
लोकसभा निवडणुकीवर नजर ठेवून राज्यात प्रचार सुरू केला आहे. विद्यार्थी, युवक व शेतकरी आणि सामान्य जनतेचे प्रश्नाला वाचा फोडत राज्याच्या तिजोरीत येणारा साडेपाच लाख कोटींचे नियोजन कसे करावे सर्वांना न्याय कसा मिळेल हे जाहीर सभेत सांगणार आहे. रोजगार , शेतकऱ्यांचे प्रश्न व आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. जात धर्म सोडून राजकारण करण्याची आवश्यकता आहे म्हणूनच राज्य पिछाडीवर जात आहे असे आंबेडकर म्हणाले. 2 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे जाहीर सभा होणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी सातारा, 11 ऑक्टोबर रोजी बीड, 28 ऑक्टोबर रोजी सटाणा येथे सभा होईल.
इंडिया आघाडीने सोबत घेण्यास आतापर्यंत होकार दिला नाही पण उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. सर्व राजकीय पक्ष लोकसभा वेगळे लढले तर सर्व 48 जागेवर मजबूत उमेदवार आहे असल्याचे त्यांनी सांगितले. एमआयएम सोबत पुन्हा समझोता होणार का हा प्रश्न डि-24 न्यूजने विचारला असता ते म्हणाले अगोदर त्यांच्यासोबत गेलो होतो काय झाले तुम्हाला माहिती आहे. राज्यातील मुस्लिम समाज हा एमआयएम सोबत नाही असेही सांगायला ते विसरले नाही. मुस्लिम आरक्षणासाठी उदगीर व ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्यांनाही आरक्षण मिळावे असे आंबेडकर म्हणाले.
याप्रसंगी अमित भईगळ, सिध्दार्थ मोकळे, प्रभाकर बकले, योगेश बन, संदीप सिरसाट, लता बमने, सतीश गायकवाड, वंदना नरवडे, मिलिंद बोर्डे, संदीप जाधव
What's Your Reaction?