तायक्वांदोत एक गोल्ड, एक सिल्व्हर, तीन ब्राॅन्झ मेडल
तायक्वांदोत एक गोल्ड, एक सिल्व्हर, तीन ब्राॅन्झ मेडल
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) 21 आणि 22 डिसेंबर रोजी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे तायक्वांदो आंतरराष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेसाठी विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. बिडकीन येथील इंटरनॅशनल कोच हाफिज इम्रान यांनी तयार केलेले पाच शालेय खेळाडू यांचा भारतीय टिममध्ये पात्र ठरले होते. या खेळाडूंनी पाच मेडल जिंकत या स्टेडियमवर तिरंगा फडकावला. मेडल जिंकलेल्या खेळाडूंचे छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्यातील खेळाडूंचे नागरिक व नातेवाईकांनी अभिनंदन केले. या स्पर्धेत हुमायू हाफिज इम्रान याने गोल्ड मेडल, सार्थक कृष्णा राठोड याने सिल्व्हर मेडल, सौरभ संजय परमेश्वर, केशव देविदास वैष्णव, उबेद अफरोज पठाण याने तायक्वांदो स्पर्धेत ब्राॅन्झ मेडल जिंकले आहे
.
What's Your Reaction?