दहा वर्षांनंतर रोशनगेट ते कटकट गेट रस्त्याचा श्वास मोकळा, 7 मालमत्ता पाडल्या
रोशनगेट ते कटकट गेट रस्ता पाडापाडी सुरू...
सात रस्ता बाधित मालमत्ता पाडल्या...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने आज रोशनगेट ते कटकट गेट अतिक्रमण पाडापाडी सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकामार्फत रोशनगेट ते कटकट गेट , आझम कॉलनी मार्ग या रस्त्यावर एकूण आज 7 बाधित मालमत्ता निष्काशित करण्यात आले.
रोशनगेट ते कटकट गेट हा रस्ता बारा मीटर रुंदीचा(40 फुट) आहे हा रस्ता व्हावा म्हणून मागील दहा वर्षापासून अनेक नागरिक सामाजिक कार्यकर्ते हे पुढाकार घेत होते वेळोवेळी काही लोकांनी महापालिकेच्या विरुद्ध न्यायालयात सुद्धा दावा दाखल केला होता परंतु त्यांचे दावे फेटाळण्यात आले होते. याच भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हा रस्ता व्हावा म्हणून उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ येथे एक जनहित याचिका टाकली होती आणि त्या अनुषंगाने न्यायालयाने सुद्धा याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने प्रशासक जी श्रीकांत यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत निधी मंजूर केला. हा रस्ता व्हावा म्हणून आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांनी स्वतः पुढाकार घेतला परंतु मध्येच काही मंडळी या रस्त्याला विरोध करत होती परंतु आयुक्त तथा प्रशासक यांनी या भागात स्थळ पाहणी केली होती. व नागरिकांना कोणीही रस्ता कमा मध्ये येऊ नये , रस्ता करणे हे महापालिकेची पूर्ण जबाबदारी आहे आणि कोणी रस्ता करताना खोडा किंवा अडथळा निर्माण करत असेल तर त्याला प्रशासनाच्या वतीने नियमानुसार समज देण्यात येईल किंवा त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल असा दम ही आयुक्तांनी दिला होता. त्याच अनुषंगाने या भागात अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे, उपायुक्त अतिक्रमण सविता सोनवणे यांनी 25 सप्टेंबर पासून पाहणी करून नागरिकांना आवाहन केले व संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून या भागात कसे काम करायचे आहे व अतिक्रमणे व रस्ता बाधित बांधकामे कसे काढायचे याबाबत मार्गदर्शन केले. याबाबत अतिरिक्त आयुक्त यांनी 30 तारखेला कारवाई करणे बाबत कळविले होते परंतु काही तांत्रिक बाबी व काही नागरिकांनी याला विरोध केला होता व ही बाब आयुक्तांना नागरिकांनी फोनवर संपर्क साधून कळविली होती. आयुक्तांनी सुद्धा नागरिकांना आश्वासन दिले की पूर्ण 40 फूट म्हणजेच बारा मीटरचा हा रस्ता होईल. कोणत्याही अतिक्रमण धारकला वाचविण्यात येणार नाही. यामुळे नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आम्हाला आमची बाधित मालमत्ता दाखवा आम्ही काढायला तयार आहोत आम्हाला सहकार्य करा आम्हाला टीडीआर द्या असे आयुक्तांना फोन द्वारे मेसेज द्वारे मागणी केली यानंतर शुक्रवारी नगर रचना विभागातील अभियंता या भागातील वार्ड अधिकारी संबंधित अतिक्रम निरीक्षक यांनी नागरिकांची चर्चा करून त्यांच्या बाधित मालमत्ता किती जात आहे हे त्यांना प्रथम मोजणी करून व नकाशाद्वारे समजून सांगितले. नागरिकांची मानसिकता तयार झालेली आहे आणि नागरिकांनी प्रतिसाद द्यायला सुरुवात केलेली आहे. ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे ते लोक स्वतः रस्ता बाधित मालमत्ता काढत आहे. बाकीचे लोक आपले कागदपत्र जमा करून त्यांना मार्किंग दिल्यानुसार कारवाई होणार आहे या पथकाने आज या रस्त्यावर एकूण सात बाधित मालमत्ता निष्कशित केले आहे. सदर कारवाई करताना कोणाचाही विरोध झाला नाही. या बाधित मालमत्ता सह रस्त्यामध्ये असलेले चार टेलिफोनचे खांब काढण्यात आले. तीन लहान तीन बाय तीनचे ओटे होते तेही निष्काशीत करण्यात आले आहे. उद्यापासून उरलेली मार्किंग व उरलेले बाधित मालमत्ता काढण्यात येणार आहे याबाबत प्रशासक जी श्रीकांत यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या भागातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि मिळकत धारकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि हा रस्ता पूर्ण करून घ्यावा जर नागरिकांनी बाधित मालमत्ता धारकांनी सहकार्य नाही केले तर महापालिका नियमानुसार कारवाई करेल व रस्ता 40 फुटाचा होईल असेही आयुक्त यांनी कळविले आहे.
सदरची कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त संतोष वाहुळे, उपायुक्त अतिक्रमण विभाग सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील अतिक्रमण अधिकारी पद निर्देशित अधिकारी नईम अन्सारी, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद बीएसएनएल विभागाचे कर्मचारी तसेच महावितरणचे विद्युत विभागाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने ही कारवाई पूर्ण करण्यात आली. उद्या सकाळी पुन्हा दहा वाजेपासून पाडापाडीची कारवाई होणार आहे अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
What's Your Reaction?