धार्मिक स्थळांवरचे भोंग्यावरुन राजकारण सुरु - एसडिपिआय

मशिदींवरील लाऊडस्पीकरबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या भेदभावपूर्ण आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांचा निषेध - SDPI
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) -
सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकरबाबत केलेल्या दिशाभूल करणाऱ्या आणि विभाजनकारी वक्तव्यांचा कठोर शब्दांत पत्रकार परिषदेत प्रदेश महासचिव सय्यद कलिम यांनी निषेध केला.
त्यांनी पुढे सांगितले श्री. सोमय्या विविध शहरांतील पोलीस स्टेशनला भेट देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावत आहेत, जो केवळ लाऊडस्पीकरच्या डेसिबल पातळीवर नियंत्रण ठेवण्याबाबत आहे, त्यांना हटवणे किंवा बंदी घालण्याबाबत नाही. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अप्रत्यक्ष समर्थनामुळे पोलीस प्रशासनाला त्यांच्या बेकायदेशीर दबावाला सामोरे जावे लागत आहे, जे अत्यंत निंदनीय आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की लाऊडस्पीकरच्या वापरात डेसिबल पातळी नियंत्रित ठेवावी जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही. यामध्ये लाऊडस्पीकर हटवणे किंवा बंदी घालण्याचा कोणताही आदेश नाही. याव्यतिरिक्त, गुजरात उच्च न्यायालयाने एक याचिका फेटाळताना म्हटले आहे की अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर, जो दिवसातून पाच वेळा केवळ 10 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळेसाठी होतो, तो ध्वनी प्रदूषण किंवा सार्वजनिक आरोग्यासाठी धोका नाही. अजान ही अनेक वर्षांपासून चालत आलेली धार्मिक प्रथा आणि श्रद्धेचे प्रतीक आहे.
SDPI प्रश्न उपस्थित करते की तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष या नीच आणि भेदभावपूर्ण राजकारणावर गप्प का आहेत...? किरीट सोमय्या यांची वक्तव्ये सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा आणि समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही मागणी करतो की राज्यात कायद्याचे शासन कायम राहावे, पोलीस प्रशासन निष्पक्षपणे काम करावे आणि अशा दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांना प्रोत्साहन देऊ नये. SDPI सरकार आणि प्रशासनाला आवाहन करते की ते संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून सामाजिक एकता कायम ठेवावी.
पत्रकार परिषदेत
सय्यद कालिम प्रदेश महासचिव, समीर शाह जिल्हा अध्यक्ष, डॉ. हाफिज इमरान नजीर जिल्हा उपाध्यक्ष, अब्दुल अलीम, मोहसीन खान जिल्हा महासचिव, हाफिज समीउल्लाह काजी जिल्हा कोषाध्यक्ष, अशरफ पठान, आरेफ शाह, हाफिज अबूजर पटेल, रियाज सौदागर उपस्थित होते.
What's Your Reaction?






