नंदनवन काॅलनी येथे होतकरू महीलांना साड्यांचे वाटप...!
नंदनवन कॉलनी येथे होतकरू महिलांना साड्यांचे वाटप...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)
नंदनवन कॉलनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनाच्या निमित्ताने एडवोकेट भगतराज भालेराव मित्र मंडळ तसेच सुकुमार भंडारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ परिसरातील सार्वजनिक कार्यात होतकरू महिला भगिनींना साड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी एडवोकेट बाबाराव सरदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नंदनवन कॉलनी व परिसरातील 50 महिला भगिनींना ज्या सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी असतात यांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे म्हणाले नंदनवन कॉलनी आणि परिसरात आमच्या महिला भगिनी नेहमी सार्वजनिक कार्य असेल किंवा धम्माचे कार्य असेल अशा कार्यामध्ये कार्यरत असतात अशा गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त कोणताही अनाठही खर्च न करता गरजू महिलांना मदत करणे हा या मित्रमंडळाचा उद्देश आहे. त्यामध्ये गरजू व होतकरू महिलांना पुढील काम करण्याची एक संधी उपलब्ध होऊन त्यांच्यामध्ये काम करण्याची ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आहे. तसेच एड. भगतराज भालेराव यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले स्त्रिया आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे कार्य उत्कृष्ट असलेले आपल्याला दिसून येते त्यामुळे महिलांचा सन्मान करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोहर वानखडे यांनी केले तर आभार श्री साळवे यांनी केले.
याप्रसंगी श्री डायलकर, श्री गवई, श्री निमाले तसेच साळवे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच कांबळे मॅडम, भंडारे मॅडम, चंद्राताई ,उल्काताई यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?