नगरसेवक अजहर पठाण लागले कामाला, ड्रेनिजचे प्रलंबित कामे मार्गी लागणार...
नगरसेवक अजहर पठाण लागले कामाला, ड्रेनिजचे प्रलंबित कामे मार्गी लागणार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - प्रभाग क्रमांक 1 चे नवनिर्वाचित नगरसेवक अजहर पठाण यांनी प्रभागात कामाला सुरुवात केली आहे. आज त्यांनी महापालिका मुख्यालयात कार्यकारी अभियंता (ड्रेनिज) तनपुरे यांची भेट घेतली. त्यांनी नगरसेवक अजहर पठाण व युनुस पटेल यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. निवडून आल्यानंतर प्रभागातील जनतेची भेटी घेऊन ते प्रश्न व समस्या जाणून घेत आहे ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. प्रभागातील हर्सुल येथील नवीन वस्त्या, सईदा काॅलनी, हरिओम नगर, जटवाडा रोड परिसरात नवीन ड्रेनिज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. प्रलंबित कामे दर्जेदार व जलद गतीने पूर्ण करावीत अशा सूचना यावेळी चर्चा करताना संबंधित अधिका-यांना नगरसेवक अजहर पठाण यांनी केली.
हर्सुल परिसरातील इब्राहीम पार्क व बिस्मिल्ला नगर येथे कचरा महापालिकेच्या वतीने उचलण्यात
आला व परिसरात स्वच्छता करण्यात आली.
What's Your Reaction?