नामांतराच्या विरोधात रस्त्यावर उतरणार एसडीपिआय
नामांतराच्या विरोधात रस्त्यावर उतरणार एसडीपिआय
औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) ऐतिहासिक औरंगाबाद विभाग, जिल्हा, तालुका, गावाच्या नामांतरावराविरोधात एसडीपिआय( सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) हा पक्ष अक्रामक झाला आहे.
पक्षाच्या वतीने आज शहरात प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. नामांतरावर शासनाने काढलेल्या गॅजेट मागे घ्यावे, औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर शहर आणि जिल्ह्याचे नामांतराचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी 11 ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. अशी माहिती डि-24 न्यूजच्या सुत्रांकडून मिळाली आहे.
औरंगाबाद विभाग जिल्हा तालुका गावाचे नामांतर आता छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्हा, तालुका, गावाचे धाराशिव नामकरण करण्यात आले.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम, प्रदेश सचिव साजिद पटेल, जिल्हाध्यक्ष मोहसीन खान, प्रदेश सदस्य जुबेर पहेलवान, जिल्हा महासचिव नदीम शेख, हाफीज अबुजर पटेल, साकी अहेमद व पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?