नाशिक पोलिसांनी नगरसेवक मतीन पटेल यांची 8 तास चौकशी करून सोडले...!
नगरसेवक मतीन पटेल यांची 8 तास चौकशी करून सोडले
नाशिक, दि.26(डि-24 न्यूज) - नाशिक टिसीएस धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी नीदा खानला छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव येथे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर आश्रय दिल्याच्या आरोपावरून नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून मतीन पटेल हे पोलिसांना शरण आले नव्हते. आज बुधवारी मतीनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आज नाशिकमध्ये पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर केले. पोलिसांनी आठ तास कसून चौकशी करत सोडून दिले. सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे अशी माहिती मतीन आणि त्यांचे वकील यांनी दिली आहे.
मतीनला माध्यमांनी प्रश्न विचारला की नीदा खानला आपण ओळखता का...? तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून आश्रय दिले होते. याबाबत पोलिसांना उत्तर दिले आहे. तपासाचा भाग आहे म्हणून न्यायालयात माहिती देणार असल्याचे वकीलांनी सांगितले.
नारेगाव येथील आश्रय दिलेले घर, राहते घर व कार्यालय मनपाने पाडले त्याबद्दल काय बोलणार याचे उत्तर देताना मतीनने सांगितले महापालिकेने चुकीची कार्यवाई केली आहे. न्यायालयात सात दिवसांची मुदत मागितली होती. त्यानंतर मनपाने 24 तासांची नोटीस बजावली तरीही 18 तासांच्या आत अतिक्रमण काढण्याची कारवाई केली आहे. न्यायालयात या प्रकरणात पुढील सुनावणी 10 जून रोजी आहे. न्यायालयात न्याय मिळेल अशी अपेक्षा मतीनने व्यक्त केली आहे.
What's Your Reaction?