नीट पेपर लिक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी - कोचिंग क्लासेस असोसिएशन

 0
नीट पेपर लिक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी - कोचिंग क्लासेस असोसिएशन

नीट पेपर लिक करणा-या दोषींना कठोर शिक्षा द्यावी - कोचिंग क्लासेस असोसिएशन 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) - नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी गंभीर खेळ झाल्याची भावना व्यक्त करत कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्राने तीव्र संताप व्यक्त केला. आयोजित पत्रकार परिषदेत राज्याध्यक्ष डॉ. पी. एम. वाघ यांनी दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

राज्य सरचिटणीस प्रा. ज्ञानेश्वर ढाकणे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि पालकांच्या विश्वासाशी खेळ करणाऱ्या अशा प्रवृत्ती समाजासाठी घातक आहेत. नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची पारदर्शकता धोक्यात आणणाऱ्या सर्व दोषींना शोधून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

असोसिएशनने प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी, सर्व दोषींना तात्काळ अटक, पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश आणि परीक्षा प्रक्रियेत अधिक सुरक्षितता व पारदर्शकता आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर कायदे आणि नियंत्रण यंत्रणा उभारावी, असेही सांगण्यात आले.

प्रा. गोपीचंद चाटे यांनी या प्रकरणाची संपूर्ण देशपातळीवर निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली. पत्रकार परिषदेला असोसिएशनचे राज्य पदाधिकारी प्रा. संदीप मस्के, प्रा. आप्पासाहेब मस्के पा., प्रा. अजाबराव राजेश इप्पर, प्रा. व्ही. जे. सोसे, प्रा. संजय तांगडे, प्रा. अरुण पठाडे महानगर पदाधिकारी व कोचिंग क्लासेस संचालक मोठ्या उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow