पिशोर येथे विज पडून तीन महीलांचा दुर्दैवी मृत्यू, तीन गंभीर जख्मी...

 0
पिशोर येथे विज पडून तीन महीलांचा दुर्दैवी मृत्यू, तीन गंभीर जख्मी...

पिशोर येथे वीज पडून तिघींचा दुर्दैवी मृत्यू, 

3 जण गंभीर जखमी...

मुलगी मृत तर आई जखमी... कन्नड तालुक्यात हळहळ...

पिशोर, दि.17(डि-24 न्यूज)- कन्नड तालुक्यातील मौजे वाघूळखेडा (पिशोर) शिवारामध्ये आज गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने 3 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांना शेतातून घरी आणण्यासाठी गेलेल्या सलीम सय्यद व हनीफ सय्यद यांना या महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या. गट क्र. 71 मध्ये अद्रक निंदण्यासाठी गेलेल्या महिला पाऊस आल्याने बांधावर असलेल्या कवटाच्या झाडाखाली थांबलेल्या होत्या त्यांच्यावर वीज कोसळल्याने तिघीजणी जागीच ठार झाल्या तर बाकीचे तिघेजण एक गंभीर जखमी झाले असून बेशुद्धअवस्थेत त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल केले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

फरजाना हमीद सय्यद (वय वय 35) तस्लिम मुक्तार सय्यद (वय 39) अलमिरा हनिफ सय्यद (वय 17) यांचा मृत्यू झाला असून हाफिज खलील सय्यद (वय 25) अनिसा निसार सय्यद (वय 38)

हमीदा हनीफ सय्यद (वय 40) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील मयत अलमीरा सय्यद ही जखमी हमीदा सय्यद यांची मुलगी आहे. 

 हे सर्वजन गट नं. 71 मधील खलील हमीद सय्यद यांच्या शेतात अद्रक खुरपनीचे काम सुरू होते अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार -पाऊस चालू झाल्याने ही सर्वजण कवठाच्या झाडाखाली थांबले होते तेवढ्यात विजेच्या कडकडाटासह कोसळली.

सय्यद साबीर सरदार, सय्यद अरबाज अजीज, शेख हारुण मुसा, शेख सलीम हमीद, सय्यद अन्सार आयुब, सय्यद हारुण, शेख वसीम सरदार, सय्यद गणी, सय्यद बाबूलाल गणी सय्यद यांनी 

जखमींना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय व छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात हलवले. गंभीर जखमींपैकी तिघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी रुग्णालय) येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कन्नड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow