पुण्याच्या नराधमाला फाशिची शिक्षा देण्याची उबाठा महीला आघाडीची मागणी...!

पुण्याच्या नराधमाला फाशिची शिक्षा देण्याची उबाठा महीला आघाडीची मागणी...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) काल पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका नराधमाने एका महीलेवर अत्याचार करण्याची घटना घडल्यानंतर महाराष्ट्र हादरले आहे. महीलांची सुरक्षा ऐरणीवर आली असल्याने संतापाची लाट उसळली आहे. या नराधमाला अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे(उबाठा) च्या महीला आघाडीने सरकारकडे केली आहे. दुपारी चार वाजता सेंट्रल बसस्थानकात महीलांच्या वतीने निषेध आंदोलन करत अशी घटना पुन्हा घडू नये लाडक्या बहीणींना 1500 रुपये नको सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा हवी अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी आशाताई दातार, सुकन्या भोसले, नलिनिताई बाहेती, सुनिता सोनवणे, सुनिता औताडे, सविता निगुळे, सुचिता आंबेकर, जमुना ठाकुर, शिलाताई गुंजाळ, विजयाताई पवार, भारती हिवराळे, प्रतिभा राजपूत, सुमित्रा डिकोवाडे, रंजना आहेर, संध्या कोल्हे, मंगल डोंगरे, अर्चना काथार, अरुणा पुणेकर, मंगला हिवराळे, रेखा फलके, पदमा तुपे, रंजना कोलते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






