पुसेसावळीत उसळलेल्या दंगलितील दोषी आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर शिक्षा देण्याची मागणी

 0
पुसेसावळीत उसळलेल्या दंगलितील दोषी आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर शिक्षा देण्याची मागणी

पुसेसावळीत उसलेल्या दंगलीतील दोषी आरोपिंना कठोर शिक्षा देण्याची मागणी...

पिडीत कुटुबाला आर्थिक मदत द्यावी, मुस्लिम नुमायंदा कौन्सिलची मागणी...

औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत उसळलेल्या दंगलितील दोषी आरोपींना अटक करुन कठोर शिक्षा द्यावी व पिडीत कुटुबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी विभागीय आयुक्त यांच्या मार्फत राज्यपाल यांच्याकडे मुस्लिम नुमायंदा कौन्सिलने निवेदनात केली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सोशलमिडीयावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल करण्यात आली. यामुळे या गावातील शांतता भंग झाली व दंगल उसळली. याचा केंद्रबिंदू कुठे आणि कोणाकडे आहे याचा शोध करणे आवश्यक आहे. निष्पक्ष घटनेची चौकशी करून सत्य समोर आले पाहिजे. त्या गावातील जामा मस्जिदमध्ये नमाज पठण करणा-या लोकांवर हल्ला करण्यात आला. या घटनेत युवक नुरहसन, वय 28 याची हत्या करण्यात आली. जमावाने हल्ला केलेल्या या हल्ल्यात 15 हून जास्त लोक जखमी झाले. या घटनेची आम्ही निंदा करतो. या घटनेची जितका निषेध केला तो कमी आहे. यामुळे मस्जिदच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धार्मिक स्थळांची सुरक्षा आवश्यक आहे. तेथील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला स्वतः चे संरक्षण करण्यासाठी शस्त्रे उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

घटनेची सखोल चौकशी करून नूरहसनची हत्या करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करुन युएपिए सारखे कलम दोषी आरोपिंना लावण्यात यावे. 

शहीद झालेल्या नुरहसनच्या पिडीत कुटुबाला दोन कोटी रोख, पाच एकर शेती, एका व्यक्तीला सरकारी नोकरी व जखमींना दहा लाखांची आर्थिक मदत द्यावी.

धार्मिक स्थळांची नुकसान झाले आहे मालमत्तेचे पुनर्वसन करावे. दंगलखोरांकडून नुकसानभरपाई वसूल करण्यात यावे. ज्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सुरक्षेची जवाबदारी होती त्यांची चौकशी करून पोलिस विभागातून बडतर्फ करण्यात यावे. आठ दिवसांच्या आत कार्यवाही केली नाही तर लोकशाही मार्गाने राजभवन, मुंबई येथे धरणे उपोषण व आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

याप्रसंगी जियाऊद्दीन सिद्दीकी, एड फैज सय्यद, मुनतजिबोद्दीन शेख, मेराज सिद्दीकी, मौलाना कय्यूम नदवी, शोएब सिद्दीकी, मोहंमद हुसेन रजवी, आदील मदनी, कामरान अली खान, अब्दुल मोईद हशर आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow