पुसेसावळी दंगलीतील मास्टर माईंडवर कारवाई का नाही - डॉ.गफ्फार कादरी
पुसेसावळी दंगलीतील मास्टर माईंडवर कारवाई का नाही - डॉ.गफ्फार कादरी
पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी एम आय एम 10 ऑक्टोबर पासून राज्यव्यापी आंदोलन छेडणार...?
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात उसळलेल्या दंगलीत एका निष्पाप युवकाला जीव गमवावा लागला. पोलिसांनी अगोदरच सतर्कता बाळगून आक्षेपार्ह पोस्टची चौकशी करून कारवाई केली असती दंगल झाली नसती आतापर्यंत तपासात समोर आली नाही कोण ते आक्षेपार्ह पोस्ट केली होती, आतापर्यंत दंगल घडवणारे मोकाटच आहे. मुस्लिम धार्मिक स्थळावर या दंगलीत हल्ला करण्यात आला. या घटनेत दहा ते पंधरा लोक जखमी झाले होते. दुकाने, वाहने जाळून व तोडफोड करुन लाखोंचे नुकसान करण्यात आले. पोलिसांना तक्रारीत दंगलीतील मास्टरमाईंडचे नावे दिली. भाजपाचे राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर बोलत आहे गृहमंत्री आमच्या पाठीशी आहे. म्हणून या घटनेला हवा दिली. पूर्व नियोजित कट होता. घटनेनंतर तक्रारीत नाव दिल्यानंतर सुध्दा आरोपिंवर गुन्हा दाखल होत नाही, ज्या इन्स्टाग्रामच्या पोस्टमुळे हा वाद उद्भवला त्या प्रकरणाची सुध्दा चौकशी झाली नाही, 19 ऑगस्ट रोजी भाजपा उपाध्यक्ष विक्रम पावसकर हे आक्षेपार्ह इन्स्टाग्रामच्या पोस्ट विरोधात निवेदन देण्यासाठी पुसेसावळी पोलिस ठाण्यात गेले होते त्यावेळी त्यांनी चिथावणीखोर भाषण दिले होते, याप्रकरणी चौकशी केली तर सत्य समोर येईल, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण करुन पिडीतांना न्याय मिळवून द्यावा व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफार कादरी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
या पत्रकार परिषदेला पुसेसावळी गावातील पिडीत उपस्थित होते. त्यांनी यावेळी आपबिती सांगितली.
10 सप्टेंबर रोजी मौजे पुसेसावळी रात्री 8 ते 9.30 दरम्यान हि दंगल उसळली होती. 30 वर्षीय नरुल हसन लियाकत शिकलकरी या युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला. तो कुटुंबातील एकूलता एक मुलगा होता. उच्चशिक्षित इंजिनिअर होता. सर्व जाती धर्मातील लोकांशी चांगले संबंध होते. गडकिल्ले संवर्धन स्पर्धा असो सर्व जाती धर्माच्या सणात तो सहभाग घेत होता. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, आम्ही वेळोवेळी निवेदने व तक्रारी देऊन मागणी केली आहे अशी माहिती यावेळी नरुल हसनचे पिता लियाकत शिकलकरी यांनी केली आहे.
शहीद झालेल्या युवकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत सरकारने द्यावी, जखमींना सुध्दा मदत करावी. या घटनेत जखमी झालेले अब्दुल कादीर यांच्यासह धार्मिक स्थळावर कसा हल्ला करुन पंधरा लोकांना मारहाण करून गंभीर जखमी केले याची माहिती दिली.
दोषी असलेले समाजकंटक व पोलीस यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी नाही तर 10 ऑक्टोबर पासून राज्यव्यापी आंदोलन एमआयएम च्या वतीने करण्यात येणार असल्याचा इशारा डॉ.कादरी यांनी दिला आहे.
याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अखिल मुजावर, अडपाळी अध्यक्ष अमित वाघमारे, सुभाष बनसोडे, जफर शेख, जोहरा बाजी, सलमा सय्यद आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?