पेट्रोल पंपावर गर्दी करु नये, अफवांवर विश्वास ठेऊ नका - जिल्हा पुरवठा अधिकारी... पेट्रोल डिलर्स असोशिएशनचेही आवाहन
पेट्रोल पंपावर गर्दी करु नये, अफवांवर विश्वास ठेऊ नका - जिल्हा पुरवठा अधिकारी
औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) आज सकाळपासून शहरातील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनधारकांची गर्दी होत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी वाहनधारकांना आवाहन केले आहे पेट्रोल पंपावर गर्दी करु नये. पेट्रोलियम वाहतूक करणाऱ्या वाहनांचे वाहन चालक संप पुकारण्यात आला असून त्यामुळे पेट्रोल डिझेल टंचाई निर्माण होणार असल्याची अफवा लोकांपर्यंत सोशल मीडियावर पसरल्याने पेट्रोल पंपावर गर्दी होत आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सर्व पेट्रोलियम पुरवठा सुरळीत चालू आहे नागरीकांनी विनाकारण गर्दी करु नये. तसेच अत्यावश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल मागणी करुन कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याकरीता प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
पेट्रोलियम डीलर्स असोशिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनीही आवाहन केले आहे गर्दी करु नये संपाबाबत आतापर्यंत टँकर चालकांनी काही माहिती दिली नाही म्हणून विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करुन कृत्रिम टंचाई निर्माण होईल यासाठी शांतता राखावी आमचा पूर्ण प्रयत्न आहे जिल्ह्यातील एकही पेट्रोल पंप ड्राय होणार नाही. यासाठी वाहनधारकांनी गर्दी न करता सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.
डि-24 न्यूजने दिल्लीगेट पेट्रोल पंपावर भेट दिली असता तेथे चारचाकी व दुचाकी वाहनांची इंधन भरण्यासाठी गर्दी दिसून आली. यामुळे पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे. येथील व्यवस्थापक यांनीही आवाहन केले आहे पेट्रोल पंपाचा संप नाही. इंधनाचा पुरवठा आहे. विनाकारण गर्दी करु नये. वाहनधारकांनी सांगितले कामासाठी जावे लागते म्हणून गाडीत पेट्रोल नसले तर रोजंदारी बुडणार आम्हाला माहिती मिळाली की वाहनधारकांचा चक्काजाम पुन्हा सुरू होणार आहे. हिट एण्ड रन कायद्याविरोधात संप करणार असल्याचे ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्व पेट्रोल पंपावर गर्दी झाली. तरी नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका. संप आहे अशी कोणतीही अधिकृत माहिती डि-24 न्यूजला मिळाली नाही. कोणतीही वाहन संघटना याबद्दल बोलायला पुढे आली नाही. म्हणून जनतेने पेट्रोल पंपावर गर्दी करुन वेळ वाया घालवू न
का.
What's Your Reaction?