पोलिस दलात निवडणूक आयोगाचे निर्देश डावलून बदल्या...! आदेशाची अंमलबजावणी कधी

 0
पोलिस दलात निवडणूक आयोगाचे निर्देश डावलून बदल्या...! आदेशाची अंमलबजावणी कधी

पोलिस दलात निवडणूक आयोगाचे निर्देश डावलून बदल्या!

केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश धाब्यावर, आदेशाची अंमलबजावणी कधी...

औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज ) लोकसभा निवडणुका 2024 च्या अनुषंगाने पोलिस, महसूल, अन्य शासकीय विभागातील कार्यालयातील अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. निवडणुकीशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या पोलिस अधिका-यांना तीन वर्ष व त्यापेक्षा अधिकचा कालावधी एका ठिकाणी झालेला असेल त्यांची बदली दुस-या जिल्ह्यात बदली करावी असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. मात्र, शहर पोलिस दलात सर्व नियम धाब्यावर बसवून पाच वर्षापेक्षा जास्त कार्यरत असलेल्या अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या नाही. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शहर पोलिस दलात मर्जीतील अधिका-यांना पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून सुध्दा त्यांची बदली करण्यात आली नाही. त्या अधिका-यांना कुणाचा आशीर्वाद आहे याची कुजबूज सुरु झाली आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, संभाजी पवार, अविनाश आघाव, ब्रम्हा गिरी, जनार्दन साळुंके या अधिका-यांचा कार्यकाळ चार वर्षापेक्षा जास्त झाला आहे. तरी सुध्दा या अधिका-यांची बदल झाली नाही. या अधिका-यांवर एवढी मेहरनजर कुणाची... ? अशीही चर्चा शहर पोलिस दलात सुरु आहे. मर्जीतल्या अधिका-यांसाठी व इतर अधिका-यांसाठी नियम वेगळे का अशीही चर्चा जोरात सुरु आहे.    

आयोगाने घेतली दखल तरीही...

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पोलिस दलात अधिका-यांच्या बदल्या करताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश धाब्यावर बसविण्यात आले. त्याची दखल महाराष्ट्र प्रशासनिक लवाद (मॅट) आणि आयोगानेही घेतली आहे. आयोगाने याबाबतचा अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयाकडून मागविला आहे हे विशेष.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow