हे सरकार पाकीटमार - खासदार फौजिया खान

हे सरकार पाकीटमार, राष्ट्रवादी महीला आघाडी रस्त्यावर...! खासदार फौजिया खान यांचा घणाघात
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.10(डि-24 न्यूज) निवडणूक जवळ आली तर या सरकारला लाडकी बहीण व लाडका भाऊ आठवत आहे. मध्य प्रदेशात तेथील निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना सुरू केली होती निवडणूक संपल्यावर सत्ता आल्यानंतर भाजपाने ती योजना गुंडाळली. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात होणार आहे. मते घेण्यासाठी हि योजना आहे त्यानंतर ती योजना गुंडाळली जाईल. हे सरकार पाकीटमार आहे बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे, शेतकरी बेरोजगार आत्महत्या करत आहेत. महीलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधा देण्यासाठी या सरकारचे लक्ष नाही. लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत गर्दी होत आहे अगोदर आपल्या खिशातून हे सरकार पैसे काढत आहे त्यानंतर नियमित पैसे मिळणार की नाही याची शाश्वती नाही. भगिनींना असले पैसे नकोत त्यांना रोजगार, आरोग्य सुविधा, महागाई कमी होईल, पिण्याचे पाणी, पक्के रस्ते, पक्के उड्डाणपूल व पायाभूत सुविधा द्या. बिल्कीस बानो, ज्या महीला पहेलवान ज्यांनी देशासाठी ऑलिंपिक मध्ये पदक आणले साक्षी मलीक, विनेश फोगाट यांना न्याय मिळाला का...? बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिस ठाण्यात भाजपाचा माजी सभापती महीलेला पोलिसांसमोर मारहाण करताना व्हिडिओ व्हायरल झाला हा सन्मान आहे का महीलांचा...मग लाडली बहीण म्हणता हि योजना फसवी आहे लाडली खुर्चीसाठी हे सर्व चाललंय. जिएसटीच्या माध्यमातून खिसा कापला जात आहे. आपल्या टॅक्सचा असा खेळ सुरू आहे. तिजोरीत खडखडाट असताना आश्वासन देने सुरुच आहे असा घणाघात महीला विभाग राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत केला.
दिल्लीगेट येथे एका सभागृहात त्यांच्या उपस्थितीत जागृती यात्रा पहिला टप्पा सुरू केला या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी दिल्लीगेट येथे हातात "हे सरकार पाकीटमार है" म्हणत महीला राष्ट्रवादीने आंदोलन केले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी खासदार फौजिया खान, राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई मिरगे, सुरजित सिंग खुंगर, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, इलियास किरमानी, नवीन ओबेरॉय, मुन्नाभाई, महीला जिल्हाध्यक्ष छायाताई जंगले, शहराध्यक्ष मेहराज पटेल, सुनिता चौव्हान, मंजूषा पवार, कविता होळकर, शकीला खान, शबाना बाजी, वैशाली वाहूळ, नाजेमा बाजी, अनिसा बाजी आदी उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?






