पोलिस हक्क संघर्ष संघटनेचा वर्धापनदिन थाटात साजरा

पोलीस हक्क संघर्ष संघटनेचा दुसरा वर्धापन दिन साजरा
थाटात संपन्न...
बीड, दि.28(डि-24 न्यूज)-पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा दुसरा वर्धापन दिन साजरा शनिवार दिनांक 28 जुन रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, नगर रोड बीड जिल्हा बीड येथे साजरा संपन्न झाला.
पोलीस हक्क संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऍड झेबा शेख या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
या कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे पोलीस उप निरीक्षक जाधव यांची विशेष उपस्थिती होती. राजेंद्र लहाने, बुलढाणा गोपाळ कच्छवे, परभणी वसंत सगळे, अब्दुल
कदीर शेख बीड, नजीमोद्दीन काजी, मुस्तफा खान, अय्युब खान औरंगाबाद, बाबुराव बडे पुणे, माधवराव सातवणे परभणी, शांताबाई जैन, बाळासाहेब राखे, यांची
विशेष उपस्थिती होती. तसेच पोलीस हक्क संघर्ष संघटनेचे पदाधिकारी महिला आणि पुरुष उपस्थित होते.
लाड सर, जलील पठाण, डॉक्टर जतीन वंजारे,
सुनंदा काकडे, जयश्री सूर्यवंशी, सलमान बागवान, सर्फराज शेख, डॉक्टर शोएब खान, अन्वर खान, रहीम इनामदार, मोहमद युनूस, राजाराम पवार, माया कांबळे, सोहेल शेख, नंदकुमार शिसोदीया, विनोद इंगोले, राहील पटेल, राजश्री उफाडे, गफ्फार शेख, इहेतशाम शेख, संतोष भाले, शुभांगी काळे, काजी मोईनोद्दीन,यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, नगर रोड, बीड येथे पोलीस हक्क संघर्ष संघटनेचे नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन पदाधिकारी लोकांचे नियुक्ती पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचारी लोकांच्या समस्या साठी सोडवण्यासाठी काम करणार आहेत, 10/20/30 वर्ष सेवा केलेल्या पोलिसांना तात्काळ पदोन्नती देण्यात यावी, पोलीस लोकांना DG लोन तात्काळ देण्यात यावे असे अनेक प्रश्न प्रलंबित आहे या साठी पोलीस हक्क संघर्ष संघटना काम करणार आहे अशी माहिती पोलीस हक्क संघर्ष संघटनेचे संस्थापाक अध्यक्ष एड झेबा अब्दुल कदीर शेख, राज्य सचिव नजीमोद्दीन काजी यांनी माहिती दिली आहे.
What's Your Reaction?






