प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ किशनचंद तनवानी मैदानात
प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ तनवाणी मैदानात...
गांधीनगर, खोकडपुऱ्यात तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल यांची पदयात्रा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज)
नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले किशनचंद तनवाणी हे आज प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले, प्रदीप जैस्वाल आणि तनवाणी यांनी आज गांधीनगर, खोकडपुरा आणि अजबनगर परिसरात भव्य पदयात्रा काढली, या पदयात्रेला तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
तनवाणी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने प्रदीप जैस्वाल यांची मध्य मतदार संघात ताकद वाढली आहे. हीच ताकद दाखवायला आज तनवाणी प्रदीप जैस्वाल यांच्यासह पदयात्रेत सहभागी झाले होते. या पदयात्रेला शेकडोच्या संख्येने युवकांची उपस्थिती होती. युवकांनी मोठ्याने घोषणा देत, ढोल-ताशा वाजवत, फटाके फोडत या पदयात्रेचा उत्साह वाढविला. तसेच परिसरातील महिलांनी प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी यांचे औक्षण केले आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदीप जैस्वाल यांनी नागरिकांशी संवाद साधला ते म्हणाले, "महायुती सरकारने महिला, युवक, कष्टकरी यांच्यासह सर्वच स्तरातील नागरिकांचा विकास केला, विविध योजना आणून सर्वसामान्यांचे जीवन सुखकर केले. आपल्या परिसरात देखील महायुती सरकारच्या काळात विकास कामे झाली, यापुढेही ती चालू राहतील, यासाठी मला तुमच्या साथीची गरज आहे. त्यासाठी मोठ्या मताधिक्याने मला विजयी करा." यावेळी नागरिकांनी देखील मोठा उत्साह दाखवला. आणि निवडणुकीसाठी प्रदीप जैस्वाल यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय केणेकर, अशोक कवडे, मिल्लू चावरिया, रामेश्वर भादवे विश्वनाथ राजपूत, चंद्रकांत इंगळे यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उवस्थिती होती.
What's Your Reaction?