प्रदुषण नियंत्रण महामंडळाची विभागीय आढावा बैठक संपन्न...

 0
प्रदुषण नियंत्रण महामंडळाची विभागीय आढावा बैठक संपन्न...

"महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाची विभागीय आढावा बैठक संपन्न..

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) -

"महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय आढावा बैठक भाजपा प्रदेश आमदार श्री संजय केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व शहरातील विविध महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कंपन्यांचे औद्योगिक प्रकल्प येत असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे. त्यामुळे औद्योगिक कचरा व प्रदूषण व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली व या संदर्भात दूरगामी विचार करून भविष्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

त्याबरोबरच, झोपडपट्टी व मागासलेल्या भागातील प्रदूषण, स्वच्छता आणि आरोग्य समस्या, शहरातील घनकचरा व्यवस्थापन, जल, वायू व मृदा प्रदूषण, हरित क्षेत्रांचे संवर्धन तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल व व्यापक चर्चा झाली.  

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कृषिक्षेत्र असून, विशेषतः पाणी व मृदा प्रदूषणाचा शेतजमिनींच्या उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात असे प्रशासनाला स्पष्टपणे निर्देश देण्यात आले. याबाबत वेळ पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले. परंतु शेतीशी संलग्न विषयांवर दुर्लक्ष करू नये हे अधिकाऱ्यांना अधोरेखित केले.

शहर व जिल्ह्याशी संबंधित तातडीच्या पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासकीय समस्या बारकाईने परीक्षण करून त्यांना सोडवण्यासाठी प्रशासकीय पाठपुरावा करण्याची जबाबदारी यावेळी निश्चित करण्यात आली. विशेषतः प्रदूषण नियंत्रणाचे कडक नियमांचे पालन, शाश्वत विकासासाठी जनजागृती व औद्योगिक क्षेत्रातील परिणामकारक उपाययोजना याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले.

बैठकीत प्रादेशिक कार्यकारी अधिकारी श्री. महेश होळकर, उप प्रादेशिक अधिकारी श्री. कुरमोडे, उप कार्यकारी अधिकारी श्री. दीपक बनसोड, श्री. नांदवटे, डॉ. कल्याण झारबडे, सौ. दीपाली लोखंडे, श्री. विक्रम वंजारी, श्री. अवचरमल यांसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जेथे त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले.

स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी सदैव कटिबद्ध आहे." असल्याचे केनेकर म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow