शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करण्याची राष्ट्रवादीची मागणी...

 0
शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करण्याची राष्ट्रवादीची मागणी...

शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करण्याची राष्ट्रवादीची मागणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) -

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना राज्यात झालेल्या अतिवृष्टी बाधित शेतकरी आणि नागरिकांना तत्काळ मदत जाहीर करण्यात यावी व हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले.

मागील काही दिवसापुर्वी झालेल्या अतिवृष्टीने महाराष्ट्रात मोठे संकट निर्माण केले आहे. त्यामुळे राज्यातील शेती, पिके, फळबागा आणि भाजीपाला यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषत: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली असून, शेती पुर्णपणे उद्धवस्त झाली आहे. या संकटामुळे राज्यातील लाखो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान पुर्णपणे विस्कळीत झाले असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. मात्र शासकीय यंत्रणा या नैसर्गिक आपत्तीचा योग्य प्रतिसाद देण्यात कमी पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक प्रचंड तणावाखाली आहेत.

या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाची मागणी आहे की:

राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.

 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचे तातडीने आणि गांभीर्याने पंचनामे पूर्ण करावेत.

बाधित शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत तातडीने जाहीर करून ती त्यांच्या खात्यात जमा करावी.

ज्या गोरगरीब जनतेच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना राहण्यासाठी तत्काळ निवारा उपलब्ध करून द्यावा आणि आर्थिक मदत देऊन त्यांच्या घरांची पुनर्बांधणी करण्यास सहकार्य करावे.

राज्यातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या आशेने आपल्याकडे पाहत आहेत. आपण या संकटकाळात योग्य निर्णय घेऊन त्यांना दिलासा द्याल अशी आशा आहे, जर या मागण्यांवर तातडीने कार्यवाही झाली नाही, तर आम्हाला या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रा.शेख सलीम, सय्यद तौफिक, शहरकार्याध्यक्ष आशिष पवार, महिला जिल्हाध्यक्ष छायाताई जंगले, जिल्हा प्रवक्ता शेख शफीक, युवक शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विद्यार्थी शहरध्यक्ष सुशील बोर्डे, उद्धव बनसोडे, हरिदास शेलार, अशोक खोसरे, सोमीनाथ शिराने, ललितताई मगरे, शेख लाईकोद्दीन, मुकेश राठोड, सतीश देशमुख, राजेंद्र चव्हाण, रवी चव्हाण, आनंद मगरे, आशिष इंगळे, बादशहा शेख, अशोक बनकर, अशोक पगारे, अशरफ पठाण, इरफान शेख ,इरफान पठाण,आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow