प्रभाग रचनेवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी शिवसेनेने घेतली बैठक...

 0
प्रभाग रचनेवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी शिवसेनेने घेतली बैठक...

संभाजीनगर महानगरपालिकेत शिवसेनेला ऐतिहासिक जागा मिळणार...

शिवसेना महानगरप्रमुख राजू वैद्य यांचे पदाधिकारी बैठकीत प्रतिपादन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) : महानगरपालिकेत शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आतापर्यंत न मिळालेल्या ऐतिहासिक जागा मिळणार असल्याचे प्रतिपादन महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी पदाधिकारी बैठकीत केले. संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत हरकती दाखल करण्याच्या विषयी शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठान संपर्क कार्यालयात रविवार 31 ऑगस्ट रोजी बैठक संपन्न झाली. 

आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रभागाची महानगरपालिकेने केलेल्या रचनेची सविस्तर माहिती घ्या. योग्य आणि चुकीच्याच हरकती दाखल करा. प्रभागातील नागरिकांशी योग्य प्रकारे संवाद साधून अभ्यासपूर्वक प्रभाग रचनेच्या हरकती दाखल करा, अशा सूचना वैद्य आणि यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांना केल्या. 

शिवसेना उपशहरप्रमुख यांच्याशी संवाद साधत राजू वैद्य यांनी महानगरपालिकेने घोषित केलेल्या प्रभाग रचनेची संपूर्ण माहिती घेतली. सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी असलेल्या प्रभागाची रचना तातडीने हरकत दाखल करून समोर आणाव्या, असे आवाहनही राजू वैद्य यांनी केले. 

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष खेंडके, शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, महिला आघाडी महानगर संघटक सुकन्या भोसले, उपशहरप्रमुख वसंतभाई शर्मा, अनिल लहाने, प्रकाश कमलानी, नितीन पवार, संजय बापू पवार, दिनेश राजे भोसले, कृष्णा मेटे, सचिन वाघ, राजेंद्र दानवे, विजय सूर्यवंशी, राज नीळ, प्रमोद ठेंगडे, मुकेश खिल्लारे, जयसिंग होलीये, पुरुषोत्तम पानपट, मंगेश भाले, माजी नगरसेवक आत्माराम पवार, कमलाकर जगताप, धीरज खाकोरडिया, विभागप्रमुख नंदू लबडे, रामेश्वर मानकापे, वसंत माघाडे, सुनील धात्रक, संजय मनमाडकर, दीपक सूर्यवंशी, रामेश्वर मानकापे, सिद्धार्थ वडमारे, विनोद सोनवणे, सोपान बांगर, विजय अडलक, विनोद पवार, देवा त्रिभुवन, समाधान साळवे, कैलास तीवलकर, सचिन खरात, गणेश भालेराव, जगदीश वेताळ, सुबोध जोगदंडे, मोहन मस्के, देविदास पवार, शिवकुमार देशमुख, शिवाप्पा बेंद्रे, भानुदास गवळी, शिवा खांडकुळे, शिवाजी चवरे, संजय कोरडे, विष्णू कोरडे, मयूर तुपे, साईनाथ जाधव, उदय बारवाल, अमीर कुरेशी, गणेश कुलकर्णी, संजय शिंदे, राजू खंडागळे, कुणाल पाठक व प्रवीण खरे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow