प्रभाग 23 च्या हेल्पलाईनचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन...!
प्रभाग 23 च्या हेल्पलाईनचे मंत्री अतुल सावेंच्या हस्ते उदघाटन...
महाराष्ट्रात पहिल्यांदाच चारही नगरसेवक एकाच नंबरवर होणार उपलब्ध...
नागरीकांच्या तक्रार निवारणसाठी ऐतिहासिक पाऊल...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) -दि.23(डि-24 न्यूज)- महानगर पालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक 23 च्या हेल्पलाईन सेवेला अधिक सक्षम करत स्वयंचलित कॉलिंग सिस्टमचा प्रारंभ महाराष्ट्र राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते भाजपा कार्यालयात करण्यात आला.
प्रभाग क्रमांक 23 मधून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून डॉ.प्रमोद राठोड, बालाजी मुंढे, सत्यभामा शिंदे, आणि सुरेखा गायकवाड विजयी झाले. नागरिकांशी थेट संपर्क व्हावा आणि प्रभागातील तक्रारीचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी विद्यमान हेल्पलाईन सेवेला अधिक सक्षम करत स्वयंचलित कॉलिंग प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे. या नव्या प्रणाली मुळे नागरिकांना आपल्या हक्काच्या नगरसेवकांकडून आपली कामे सहजरीत्या करता येतील आणि चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता येतील असे मंत्री सावे यांनी सांगत या हेल्पलाईन बाबत प्रभाग क्रमांक 23 च्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले आहे.
हेल्पलाईन क्रमांक 9823871111 यावर नागरिकांनी संपर्क केल्यास क्रमांक 1 वर आपली तक्रार नागरिक नोंदवू शकतील. क्रमांक 2 दाबल्यास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा नगरसेवक डॉ. प्रमोद प्रल्हाद राठोड यांच्याशी, 3 क्रमांक दाबल्यास नगरसेवक बालाजी मुंढे यांच्याशी, क्रमांक 4 दाबल्यास नगरसेविका सत्यभामा दामूअण्णा शिंदे यांच्याशी तर 5 क्रमांक दाबल्यास नगरसेविका सुरेखा ताराचंद गायकवाड यांच्याशी नागरिकांना थेट संपर्क साधता येईल. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्वयंचलित कॉलिंग प्रणाली मुळे नागरिकांना त्यांच्या तक्रारीचे अधिक प्रभाविपणे तातडीने निराकारण करून चांगल्या सेवा देता येतील आणि प्रभाग अधिक विकसनशील होईल असा विश्वास यावेळी नगरसेवक डॉ.प्रमोद राठोड यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष किशोर शितोळे, महापौर समिर राजूरकर, सभापती अनिल मकरिये ,नगरसेवक बालाजी मुंढे, नगरसेविका सत्यभामा दामुअण्णा शिंदे, नगरसेविका सुरेखा ताराचंद गायकवाड आदीची उपस्थिती होती.
What's Your Reaction?