प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेला अतिरिक्त डब्यांची जोडणी...

 0
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेला अतिरिक्त डब्यांची जोडणी...

प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त डब्यांची जोडणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, नांदेड विभागामार्फत काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने, नांदेड विभागाला खालील गाड्यांना प्रत्येकी 02 अतिरिक्त जनरल सेकंड क्लास (GS) डबे जोडण्यास मान्यता देण्यात आली आहे :

गाडी क्रमांक 17688/17687 धर्माबाद-– मनमाड - धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस मध्ये दिनांक : 24.10.2025 रोजीच्या प्रवासासाठी हे अतिरिक्त डबे जोडले जातील, जेणेकरून सणासुदीतील प्रवासी गर्दीचा ताण कमी होईल.

गाडी क्रमांक 17618/17617 नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस मध्ये दिनांक : 24.10.2025 आणि 25.10.2025 रोजीच्या प्रवासासाठी हे अतिरिक्त डबे जोडले जातील, जेणेकरून सणासुदीतील प्रवासी गर्दीचा ताण कमी होईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow