प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी माणूसकी समुहाने केले धरणे आंदोलन
प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी माणूसकी समुहाचे धरणे अंदोलन
माणुसकी समुहाच्या वतीने दिले विभागीय आयुक्तांना निवेदन....
औरंगाबाद,दि.2(डि-24 न्यूज) माणुसकी रुग्ण सेवा समुहाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे प्रादेशिक मनोरुग्णालय जालना ऐवजी औरंगाबाद येथे व्हावे याकरिता मुंडन अंदोलन करण्याचे ठरवीले होते परंतु प्रशासनाने मुंडन आदोंलनाची परवानगी नाकारली असता धरणे आंदोलन करण्यात आले, या आंदोलनाची सुरवात महात्मा गांधी यांची जयंती साजरी करुन राष्ट्रगायनाने करण्यात आली ,
मराठवाड्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाची प्रशासकीय मान्यता जालना ऐवजी औरंगाबाद करणे बाबत मंत्रीमंडळ बैठकीत माणुसकी समुहाच्या वतीने समाजसेवक सुमित पंडीत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते.
3/8/2021 रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीत 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय जालना येथे स्थापन करण्यास शासन निर्णय दि.5 आॕक्टोबर 2021 चे शासनाचे पत्र,निर्णय द्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. अद्याप पावेतो तिथे कुठलेही काम झालेले नाही.
तसेच हे शहर मराठवाड्याचे मुख्यालय आहे, शहराचे भौगोलिक तथा लोकसंख्येचे महत्व लक्षात घेता मराठवाडा खांन्देश, विदर्भ मधील काही जिल्हे त्यापैकी धुळे,
नंदुरबार, जळगाव, बुलढाणा
जालना, बीड, लातूर, हिंगोली उस्मानाबाद, परभणी, नांदेड,
औरंगाबाद हे शहर या प्रशासकीय मुख्यालयाचे केंद्र असून इथे विभागिय कारागृह आहे. या कारागृहात हजारो कैदी आहेत त्या कैद्यांच्या मनोस्वास्थ्याचा प्रश्न वेळोवेळी निर्माण होतात तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ शहरात आहे. ज्या मनोरुग्ण झालेल्या आरोपी अथवा गुन्हेगारांची न्यायालयास गरज भासल्यास त्यांना सहज मनोरुग्णालयात हजर करणे सोईचे आहे. तसेच इतर शासकीय वैद्यकीय सेवासुविधांची गरज मनोरुग्णांना पडल्यास घाटी सारखी कनेक्टीव्हीटी मिळणे जालन्या पेक्षा केंव्हाही सोपे आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले परंतू त्यावर कुठलाच निर्णय घेतला नाही म्हणून माणूसकी समुहाने धरणे आंदोलन करुन घोषणा देण्यात आल्या,यात पाच जणांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. याविषयी आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाली ,त्यांनी सांगितले की मी शासनदरबारी आपले प्राप्त निवेदन पाठवून पाठवुरावा करण्यात येईल यावेळी
माणुसकी समुहाचे मार्गदर्शक मुक्ताराम पाटील गव्हाणे, समाजसेवक सुमित पंडित,
प्रा.शरद सोनवणे
आकाश ढवळे, प्रा.डाॕ.विठ्ठल बटुळे, प्रा.डाँ,यौगेश भाले, पिराजी पाटील वराडे, सय्यद साबेर, रावसाहेब बकले, विलास बनसोडे, ज्युनिअर चार्ली फाँडेशनचे कलाकार सोमनाथ स्वभावणे, नियाज चौगुले, प्रा. अनंत कांबळे, समाजसेविका सौ.पुजा पंडित यांच्यासह माणुसकी समुहाचे सभासद उपस्थित होते.
What's Your Reaction?