प्राधिकरण समितीची बैठक होत नसल्याने ऑटो चालकांचे प्रश्न जैसे थे...! दंड भरण्यासाठी नाही पैसे

 0
प्राधिकरण समितीची बैठक होत नसल्याने ऑटो चालकांचे प्रश्न जैसे थे...! दंड भरण्यासाठी नाही पैसे

प्राधिकरण समितीची बैठक होत नसल्याने ऑटो चालकांचे प्रश्न जैसे थे...! दंड भरण्यासाठी नाही पैसे...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.20(डि-24 न्यूज) प्राधिकरण समितीची बैठक होत नसल्याने ऑटो चालकांचे प्रश्न जैसे थे असल्याने रिक्षा चालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्र लिहून लवकर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे.

तात्कालिन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 2/10/2023 रोजी प्राधिकरण समितीची शेवटची बैठक घेतली. त्यानंतर आस्तिक कुमार पाण्डेय जिल्हाधिकारी असताना त्यांनी रिक्षाचालकांची बैठक घेतली नाही. नवीन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी येताच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली होती आता आचारसंहिता संपलेली आहे त्यांनी प्राधिकरण समितीची बैठक घ्यावी व ऑटो चालकांच्या समस्या जाणून घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. 

केंद्र व राज्य सरकारने नुतनीकरणाला लावलेला 50 रुपये प्रति दिवस दंड तातडीने रद्द करावा. रिक्षाचे मागेल त्याला परवाना किमान सहा महीन्यात साठी स्थगित करावा. ई-रिक्षाला पेट्रोल LPG, CNG प्रमाणे नियम व अटी लावा. नसता ई-रिक्षा बंद करा. प्राधिकरण समितीची बैठक तात्काळ घेण्यात यावी. प्राधिकरण समितीमध्ये गैर सरकारी सदस्य म्हणून रिक्षा चालक युनियनच्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

पत्रात अध्यक्ष निसार अहमद खान, सरचिटणीस साहेबराव साबळे, कार्याध्यक्ष शेख अखिल, उपाध्यक्ष इम्रान पटेल यांची सही आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow