प्रियदर्शनी विद्यालयात इंग्लिश स्पिकींग कोर्सला सुरुवात...

 0
प्रियदर्शनी विद्यालयात इंग्लिश स्पिकींग कोर्सला सुरुवात...

मनपा प्रियदर्शनी विद्यालयात इंग्लिश स्पीकिंग कोर्सला सुरुवात...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) - मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी येथे इंग्रजी भाषेची विद्यार्थ्यांची भीती दूर व्हावी तसेच इंग्रजीमध्ये सोप्या पद्धतीने संवाद साधण्यासाठी इंग्लिश स्पिकिंग कोर्सची आवश्यकता वाटली.

 त्यामुळे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या प्रेरणेने व उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली फिनिक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे संचालक ॲड. मोहन कोरडे यांनी इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू केला आहे. 

आज या कार्यक्रमाचे उद्घाटन मनपा शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी यावेळी स्पीकिंग कोर्सचे महत्व सांगितले.

शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका मनीषा नगरकर यांनी सर्वांचे स्वागत केले. या कोर्स साठी मार्गदर्शक म्हणून स्वतः ॲड. मोहन कोरडे हे मार्गदर्शन केले. आज त्यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन इंग्रजी भाषेची भीती घालवण्याचा प्रयत्न केला. इंग्रजी विषयातील वर्तमान काळ या विषयावर हसत खेळत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याकडून व शिक्षकांकडून प्राथमिक चाचणी सोडवून घेण्यात आली. याप्रसंगी सहावी ते नववीतील विद्यार्थी व सर्व वर्ग शिक्षक उपस्थित होते. सदरील प्रशिक्षण तीन दिवस चालणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गुळवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तेजस्विनी देसले, प्रकाश इंगळे, संगीता चौधरी, सूर्यमाला जाधवर, किरण पवार, रेखा माचेवार , हर्ष नरवडे , सचिन लवेरा, काकासाहेब जाधव यांनी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow