बंजारा समाजाचे उपोषण सोडविण्यास मंत्री अतुल सावे यांना यश
बंजारा समाजाचे उपोषण सोडविण्यात मंत्री सावें ना यश..
औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) विभागीय आयुक्त कार्यालय समोर सुरू असलेले बंजारा समाजाचे उपोषण सोडवण्यात राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांना शनिवारी यश आले.
वसंतराव नाईक महामंडळाची भाग भांडवल मर्यादा 1500 कोटी रुपये करण्यात यावी, सदरील महामंडळातर्फे राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना थेट योजनेअंतर्गत एक ते पंधरा लाखांपर्यंतचे कर्ज त्वरित वाटप करण्यात यावे, या अशा इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय समोर विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत होते. शनिवारी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषण कर्ते यांच्या सोबत चर्चा करून उपोषण सोडण्याची विनंती केली. तसेच आपल्या मागण्या संदर्भात सरकार सकारात्मक असून लवकरच त्याबद्दल बैठक घेऊन आपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन यावेळी बोलतांना मंत्री श्री अतुल सावे यांनी दिले. तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाच्या विविध योजनेच्या माध्यमातून देखील तांडा वस्ती सुधारण्यासाठी आणि तेथील विकासासाठी आपण प्रयत्न शिल असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी चर्चा झाल्या नंतर उपोषण कर्त्यांनी मंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते ज्यूस घेत आपले सोडले.
यावेळी प्रमोद राठोड, विवेक राठोड, मानसिंग चव्हाण, रतन नाईक, जयकुमार राठोड,राजू राठोड, सुधीर पवार दिलीप राठोड, गुलाब चव्हाण, मुरलीधर राठोड, रमेश राठोड, यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?