बकरी ईद शांततेत साजरी करावी - पोलिस आयुक्त संदीप पाटील

 0
बकरी ईद शांततेत साजरी करावी - पोलिस आयुक्त संदीप पाटील

बकरी ईद शांततेत साजरी करावी - पोलिस आयुक्त संदीप पाटील

औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) 17 जून रोजी ईद उल अजहा(बकरी ईद) साजरी होणार आहे. ईद शांततेत साजरी करावी, नागरीकांनी सहकार्य करावे, कोठे अनुचित प्रकार घडला तर टोल फ्री क्रमांक 112 वर कळवावे, सोशल मीडियावर अफवा पसरवून शांतता भंग करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी मार्गदर्शन करताना केले आहे. 

पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात शांतता कमेटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

यावेळी शहरातील मुस्लिम समाजाचे धर्मगुरू, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी सांगितले ईदनिमित्त विद्युत खंडीत होणार नाही, पुरेशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी, वाहतूकीचे नियोजन करण्यात यावे. कुर्बानी नंतर साफसफाई करावी आदी सूचना केल्या.

यावेळी मौलाना इक्बाल अन्सारी, अब्दुल रशीद खान मामू, मोईनोद्दीन फारुकी, हाजी इसा कुरैशी, ख्वाजा शरफोद्दीन, डॉ.मुर्तुझा, अफसरखान, शरफोद्दीन सिद्दीकी, गजानन बारवाल, पृथ्वीराज पवार, राजु दानवे, संजय चौधरी, काजी शकील, मोहम्मद हुसेन रिझवी, मोहम्मद ताहेर, मोईनोद्दीन कुरेशी, मौलाना नईम, जुनेद फारुकी तसेच पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत, पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, अतिरिक्त आयुक्त मनपा रंजीत पाटील, पशु वैद्यकीय अधिकारी शेख शाहिद, प्रदीप झोड आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow