बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेततेसाठी मुख्यमंत्र्यांकडून उपाययोजना... Unrest-Bangladesh-Students
बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना
विद्यार्थ्यांची सुरक्षीतता आणि त्यांच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा
मुंबई, दि. 6(डि-24 न्यूज) बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची पावले उचलली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांच्या भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.
बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधला असून बांगलादेशातील परिस्थितीचे गांभीर्य पाहता त्वरित कृतीची गरज अधोरेखित केली आहे. प्रभावित विद्यार्थ्यांना सर्व शक्य मदत करण्याची विनंती केली आहे. त्यांची तात्काळ सुरक्षितता सुनिश्चित करणे, आवश्यकता असल्यास बांगलादेशातील सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करणे, भारतात त्यांच्या सुरक्षित परतीची प्रक्रिया जलद करणे याअनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी चर्चा केली आहे.
बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविणे आणि त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सध्या बांगलादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी संकलित करून परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्वरित संपर्क साधण्यास आणि मदत उपलब्ध करणे शक्य होणार आहे. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि केंद्रीय अधिकारी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आले आहे. बांगलादेशातील भारतीय दूतावासाशी समन्वयाने काम करण्यात येत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करता येतील.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांचे मायदेशात परतण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या आव्हानात्मक काळात राज्य सरकार बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसमवेत सक्षमपणे उभे आहे.
English News...
Unrest-Bangladesh-Students
Measures taken by CM Shinde for the safety of students of the state stuck in Bangladesh
Mumbai,Aug 6(D24NEWS)
In the wake of civil unrest in Bangladesh, Maharashtra State Chief Minister Eknath Shinde has taken important steps for the safety of the Maharashtra students stuck there and their return to their homeland.
Chief Minister Shinde has contacted the Ministry of External Affairs (MEA) on Tuesday.
The unrest in Bangladesh has raised questions about the safety of foreign nationals, especially students stranded in troubled areas. In this background Chief Minister Shinde has prioritized the safety of Maharashtra students studying there.
Chief Minister Shinde has interacted with the MEA and has highlighted the need for immediate action in view of the seriousness of the situation in Bangladesh. Affected students are requested to provide all possible assistance. In order to ensure their immediate safety, to relocate them to a safe place in Bangladesh if necessary, to speed up the process of their safe return to India, discussed Shinde.
In order to get information about the students stranded in Bangladesh and provide immediate assistance to them, a list of students from the state currently in Bangladesh has been compiled and made available to the MEA. So it will be possible to contact these students immediately and provide help.
A team has also been set up by the state government to monitor the situation there and keep in touch with the central authorities and the affected families. Coordination is being done with the Indian Embassy in Bangladesh, so that measures can be taken for the safety of the students.
Shinde said that the safety of the students is the highest priority. All necessary measures are being taken for their return to their homeland. The state government stands ably with the families of the affected students during these challenging times,he assured.
What's Your Reaction?