बारावीनंतर पदवी सोबत युपीएससी - एमपीएससीची तयारी...!

 0
बारावीनंतर पदवी सोबत युपीएससी - एमपीएससीची तयारी...!

बारावीनंतरच पदवीसोबत यूपीएससी-एमपीएससीची तयारी...

‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाचा अभिनव उपक्रम; प्रशासकीय अधिकारी होण्याचा मार्ग अधिक सुकर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)-: केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), बँकिंग, कर्मचारी निवड आयोग (एसएससी) तसेच अन्य स्पर्धा परीक्षांसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात. मात्र, पदवी पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्रपणे स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वेळ आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. ही गरज लक्षात घेऊन एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसने (एसआयसीएस) बारावीनंतरच पदवी शिक्षणासोबत यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांची एकात्मिक तयारी करून देणारा बी.ए. (अॅडमिनिस्ट्रेशन) हा अभिनव अभ्यासक्रम सुरू केला आहे, अशी माहिती स्कूलचे संचालक डॉ. सुजित धर्मपात्रे यांनी दिली. शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

डॉ. धर्मपात्रे म्हणाले की, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले विषय पदवी शिक्षणासोबतच शिकता यावेत, यासाठी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यासक्रमाचा आराखडा यूपीएससी, एमपीएससी आणि बँकिंग स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पदवी पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी होण्यास मदत होते.

या अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटना, सार्वजनिक प्रशासन, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध व भू-राजकारण, सुशासन, सार्वजनिक धोरण, सार्वजनिक वित्त, भारतीय व जागतिक अर्थव्यवस्था, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, शाश्वत विकास, डिजिटल प्रशासन, कृत्रिम बुद्धिमत्ता व उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा प्रशासनावरील प्रभाव, पर्यावरणीय धोरणे, चालू घडामोडी, विश्लेषणात्मक विचार, तार्किक क्षमता, संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, व्यक्तिमत्त्व विकास, उत्तरलेखन आणि मुलाखत कौशल्य यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच शैक्षणिक चौकटीत करता येणार असून, स्वतंत्र वेळ आणि अतिरिक्त खर्चाची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

स्पर्धा परीक्षांसोबतच विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेवरही या अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. शासन, सार्वजनिक क्षेत्र, बँकिंग, प्रशासन, धोरण विश्लेषण तसेच विविध स्पर्धात्मक करिअर क्षेत्रांसाठी आवश्यक कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी www.mitsics.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा 9607580042/९६०७५८००४२ / 9607580052/९६०७५८००५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच, येत्या 11 व 12 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संचालक डॉ. धर्मपात्रे हॉटेल अमरप्रीत येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत.

तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नियमित टेस्ट सिरीज

एमआयटी एसआयसीएसमध्ये विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांचे (प्रोफेसर इन प्रॅक्टिस) मार्गदर्शन, नियमित टेस्ट सिरीज, उत्तरलेखनाचा सराव, मुलाखत प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअर मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पदवी शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची नियोजनबद्ध तयारी केल्यास वेळ, खर्च आणि प्रयत्नांची बचत होऊन यशाची शक्यता अधिक वाढते. याच उद्देशाने एमआयटी-एडीटी विद्यापीठाने शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा तयारीचा प्रभावी संगम घडवून आणणारा हा अभ्यासक्रम विकसित केला असल्याचे डॉ. धर्मपात्रे यांनी सांगितले.

"यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांतून कौशल्याधिष्ठित, मूल्याधिष्ठित आणि सामाजिक जाण असलेले अधिकारी प्रशासनात यावेत, तसेच राष्ट्रउभारणीत त्यांचे मोलाचे योगदान असावे, हा आमचा उद्देश आहे. एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसच्या माध्यमातून अशाच सक्षम, संवेदनशील आणि कर्तृत्ववान भावी अधिकाऱ्यांची जडणघडण होणार आहे."

– प्रा. डॉ. मंगेश कराड

कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती,

एमआयटी-एडीटी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow