बीड, मुख्य निरीक्षक अजीमुल हक यांच्या समक्ष झाली स्क्रुटनी, लेखी तक्रारीचेही निरसन

 0
बीड, मुख्य निरीक्षक अजीमुल हक यांच्या समक्ष झाली स्क्रुटनी, लेखी तक्रारीचेही निरसन

मुख्य निरीक्षक अजीमुल हक यांच्या समक्ष झाली स्क्रूटनी

बीड, दि.14: बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सोमवारी मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी 70.92% इतकी आहे. मतदानाच्या दिवशी विधानसभानिहाय असलेल्या मतदान केंद्रामध्ये झालेल्या मतदानामध्ये 55 %टक्के पेक्षा कमी अथवा 85% टक्के पेक्षा अधिक मतदान झालेल्या केंद्रांनी लिहिलेल्या प्रोसिडिंग नोंदणीची तपासणी मुख्य निरीक्षक अजीमुल हक्क यांनी राजकीय पक्षांच्या समक्ष केली. 

शासकीय तंत्रनिकेतन येथे आज मतदान यंत्र ठेवण्याची कार्यवाही सुरू असताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिपा मुधोळ मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, यांच्या समक्ष तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत स्क्रूटनी करण्यात आली.

 काही ठिकाणी संशयाच्या आधारावर राजकीय पक्षांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे मतदान नीट न होत असल्याची लेखी तक्रार केली होती. त्याचीही तपासणी आज करण्यात आली.

 सहा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या विधानसभा मतदार संघात ज्या ठिकाणी 55 %टक्के पेक्षा कमी आणि 85% पेक्षा अधिक मतदान झाले अशा मतदान केंद्राचे मतदान केंद्राध्यक्ष त्यांचे सहाय्यक तसेच त्यांनी प्रोसिडिंग केलेल्या नोंदी निवडणूक निरीक्षक श्री हक यांच्यासमोर सादर केले. तसेच राजकीय पक्षांनी केलेल्या संशयात्मक लेखी तक्रारीचेही निरसन यावेळी करण्यात आले. 

निवडणूक निरीक्षक यांनी त्यांचे सूक्ष्म निरीक्षक यांच्या कडून आलेल्या अहवाला सोबतही उलट तपासणी करून मतदानाच्या वेळी कुठल्याही गैरप्रकार झाला नाही त्याची खातरजमा केली. 

शहरी भागात काही ठिकाणी 55% पेक्षा कमी मतदान झाले तर ग्रामीण भागात 85 %च्या पुढेही मतदान झाल्याचे प्रोसिडिंग डायरीनुसार लक्षात आले. 

यासह मतदान ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर ओळखपत्राच्या माध्यमातून झालेल्या मतदानाबद्दलही विचारना करण्यात आली. यामध्ये मतदान ओळखपत्राच्यानंतर सर्वाधिक मतदान हे आधार ओळखपत्राद्वारे करण्यात आल्याचे प्रोसेसिंग डायरीवरून लक्षात आले. हा सर्व अहवाल भारत निवडणूक आयोग त्यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे निवडणूक निरीक्षक श्री हक यांनी यावेळी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow