बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्या तर भाजपला ग्रामपंचायत निवडणूक सुध्दा जिंकता येणार नाही - खा.संजय राऊत

 0
बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्या तर भाजपला ग्रामपंचायत निवडणूक सुध्दा जिंकता येणार नाही - खा.संजय राऊत

बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्या तर भाजपला ग्रामपंचायत निवडणूक सुध्दा जिंकता येणार नाही - खा.संजय राऊत

जागावाटपात इंडिया आघाडीचा फार्मुला तयार लवकरच घोषणा, जो जिंकेल त्याची जागा, मागच्या दारातून कोणीही आता भाजपाला मदत करणार नाही अशी एकजूट...2024 निवडणुकीत परिवर्तन, भाजपाला आता प्रभु श्रीराम सुध्दा वाचवू शकणार नाही...राऊतांचा घणाघात, मोदींशी मुख्यमंत्र्यांचे प्रेम फक्त सत्तेसाठी व ईडीच्या धाकाने...

औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) इंडिया आघाडीच्या जागावाटपात फार्मुला तयार आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल. वंचित सोबत बोलनी सुरु आहे. इंडिया आघाडीत वंचित हा घटकपक्ष आहे. प्रकाश आंबेडकर हे सकारात्मक आहे. जागावाटपात सर्व घटकपक्षांत समन्वय आहे. जो जिंकेल त्याची जागा राहणार आहे. मराठवाडा हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे. मागिल 15 दिवसांपासून मराठवाड्याच्या लोकसभा जागेसंबंधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चाचपणी करत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना व वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

काँग्रेसची देशातील 300 जागेवर ताकत आहे. प्रादेशिक पक्षांची 150 ते 175 आणि भाजपाची 100 जागेवर ताकत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत परिवर्तन होईल अशी जनतेची मानसिकता आहे.

पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर जनतेने हल्ला केला तशाच प्रकारे ईव्हीएम विरोधात जनता रस्त्यावर उतरुन अराजकता माजली तर त्याला सरकार जवाबदार राहिल. कारण जे प्रगत राष्ट्र आहे जगात कुठेही ईव्हीएमवर निवडणूक होत नाही मग जगातील बलाढ्य लोकशाही देशात ईव्हीएमवर निवडणूकीचा हट्ट कशासाठी. भाजपचे काही नेते पंतप्रधानांना विष्णूचा तिसरा अवतार मानतात. जनता तुमच्या सोबत आहे. बॅलेट पेपरवर घ्या ना मग निवडणूक. मध्य प्रदेश निकालाचा अभ्यास केला तर पोस्टल बॅलेट मतपत्रिकेत 150 जागेवर काँग्रेस आघाडीवर होती. हा ट्रेंड होता मग हा कल ईव्हीएमवर का कायम राहिला नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्या तर भाजपला ग्रामपंचायत निवडणूक सुध्दा जिंकता येणार नाही. आणि प्रभु श्रीराम सुध्दा भाजपाला निवडणुकीत वाचवू शकणार नाही असा घणाघात त्यांनी भाजपावर केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow