भाजपाचे अतुल सावे यांची हॅट्रीक, इम्तियाज जलील यांचा केला 2181 मतांनी पराभव
भाजपाचे अतुल सावे यांची हॅट्रीक, इम्तियाज जलील यांचा केला 2181 मतांनी पराभव
भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष.... शेवटपर्यंत इम्तियाज जलील यांनी दिली झुंझ, 15 मुस्लिम उमेदवारांनी घेतले 15347 मते.... शेवटपर्यंत अशी परिस्थिती होती की इम्तियाज जलील यांचा विजय होणार परंतु हा निकाल अनपेक्षित झाला व एमआयएमचे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला व एसएफएस मतमोजणी केंद्राच्या मैदानावरुन कार्यकर्ते बाहेर पडले...माजी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर यांनी शांततेचे आवाहन केले...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्र व देशाचे लक्ष लागले होते. भाजपाचे अतुल सावे यांनी अटीतटीच्या लढतीत या मतदारसंघात फक्त 2181 मतांनी विजयी होत निसटता विजय मिळवला. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी केंद्राबाहेर एमआयएम व भाजपाचे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पहील्या फेरीपासून 20 व्या फेरीपर्यंत एमआयएमचे इम्तियाज जलील पुढे होते. महायुतीचे नेते व कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. परंतु 21 व्या फेरीपासून अतुल सावे यांनी बढत घेतली. मधून मधून इम्तियाज जलिल यांना बढत मिळत असल्याने फटाक्यांची आतिषबाजी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. गोंधळ वाढल्याने गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना तणाव निवळण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. शेवटच्या फेरीनंतर अतुल सावे व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बढत मिळाल्याने जीवात जीव आला व गुलालाची उधळण सुरू झाली व कार्यकर्त्यांनी हॅट्रीक... हॅट्रीक, अतुल सावे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, जय श्रीराम अशी नारेबाजी सुरू झाली. 15 मुस्लिम उमेदवारांनी घेतली 15347 मते हि या निकालाची वैशिष्ट्य ठरली. विजयाची बातमी कळताच खासदार डॉ.भागवत कराड, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, अनिल मकरिये, जालिंदर शेंडगे व इतर कार्यकर्ते स्वागत करण्यासाठी सरसावले.
निकाल हाती आल्यानंतर अतुल सावे यांनी प्रतिक्रिया देताना कबुल केले की हा विजय फार कठीण होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि कुटुंबातील सदस्य व मतदारांचे त्यांनी आभार मानले. तिसऱ्यांदा मतदारांनी संधी दिल्याबद्दल जवाबदारी आणखी वाढली आहे आता जोमाने मतदारसंघाचा विकास करणार असल्याचे सांगितले.
मिळालेली मते...
भाजपाचे अतुल सावे यांना 93274, एमआयएमचे उमेदवार 91113, काँग्रेसचे लहु शेवाळें यांना 12568, वंचितचे अफसरखान यांना 6507, समाजवादीचे डॉ.गफ्फार कादरी यांना 5943, शितल बनसोडे 1233, इसा यासिन 567, जयप्रकाश घोरपडे 155, योगेश सुरडकर 157, रविंद्र पगारे 57, राहुल साबळे 369, साहेबखान यासिनखान 113, जकिया इलियास पठाण 142, तसनिम बानो इकबाल मोहंमद 61, दैवशाली झिने 181, निता भालेराव 472, पाशु शेखलाल शेख 495, मधूकर त्रिभुवन 107, मोहसीन सर नसिम भाई 82, राहुल निकम 99, लतिफ जब्बार शेख 130, शमीम मोहम्मद शेख 315, शहजाद खान उमर खान उर्फ दग्गु पटेल 672, शेख गुफरान अहेमद 67, सद्दाम अ.अजीज शेख 99, सलीम उस्मान पटेल 89, सोमीनाथ रामभाऊ वीर 94, संतोष पुंडलिक साळवे 64, हनीफ शाह इब्राहिम शहा 65, नोटा 1273 मते मिळा
ली.
What's Your Reaction?