भाजपाला उध्दव ठाकरेंचा धक्का, भाजपाचे माजी उपमहापौर, काही माजी नगरसेवक शिवबंधन बांधणार...?

 0
भाजपाला उध्दव ठाकरेंचा धक्का, भाजपाचे माजी उपमहापौर, काही माजी नगरसेवक शिवबंधन बांधणार...?

भाजपाला उध्दव ठाकरेंचा धक्का, भाजपाचे माजी उपमहापौर , माजी नगरसेवक प्रवेश करणार...

उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदे व काही पदाधिकारी शिवबंधन बांधणार...?

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.5(डि-24 न्यूज) विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात भाजपाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. उध्दव ठाकरे यांनी आपल्या दौ-याच्या अगोदर भाजपाला मोठा धक्का दिला आहे. भाजपाचे माजी उपमहापौर राजू शिंदे व काही भाजपाचे माजी नगरसेवक तथा अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेना उध्दव ठाकरे या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती डि-24 न्यूजच्या सुत्रांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 7 जूलै रोजी सुर्या लाॅन्सवर होणा-या शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यात राजू शिंदे यांच्या संपर्कात असलेले 6 ते 8 माजी नगरसेवक, एक जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सदस्य, एक तालुका अध्यक्ष, एक युवा मोर्चा अध्यक्ष, पाच मंडळ अध्यक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

भाजपाने लोकसभा निवडणुकीत तयारी केली होती. पदाधिकारी यांच्या भावना काय आहेत याबद्दल भाजपाचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेलो पाहिजे. अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा आमचा विचार आहे. येथे फक्त भाजपा शिंदे गटाचे काम करण्यासाठी राहिलेली आहे. असे आम्हाला वाटते. लोकसभा निवडणूकीत चांगली परिस्थिती असताना आम्हाला हि निवडणूक लढवता आली नाही दोन तीन वर्षांपासून भाजपाने येथे मेहनत घेतली. परंतु हि जागा शिंदे गटाला गेली. निवडणूक जिंकल्यानंतर शिंदे गटाचे आमदार, खासदारांनी कृतज्ञताही व्यक्त केली नाही अशी खंत राजू शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केली. 

राजू शिंदे यांनी मागिल विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढले परंतु थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला. महायुतीत हि जागा शिंदे गटाकडे आहे म्हणून आपल्याला उमेदवारी मिळणार नाही पुन्हा अपक्ष लढावे लागेल म्हणून अगोदरच उध्दव सेनेत प्रवेश करुन उमेदवारी मिळवायचा प्रयत्न आहे अशी चर्चाही आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राजू शिंदे व भाजपाचे काही पदाधिकारी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले तर भाजपाचे औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे व औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय सिरसाट यांच्या अडचणी वाढतील अशीही चर्चा रंगू लागली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow