भारतात चंद्रदर्शन, आजपासून पवित्र रमजान महीन्याला सुरुवात.....

भारतात चंद्रदर्शन, आजपासून पवित्र रमजान महीन्याला सुरुवात.....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) आज सायंकाळी बाद नमाज मगरीब भारतात चंद्रदर्शन घडले. यामुळे आजपासून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महीना सुरू झाला आहे. आज बाद नमाज इशा नंतर विशेष तरावीहची नमाज महीनाभर पठन केली जाते. आज पहाटे 5 वाजून 34 मिनिटापर्यंत सहेर करुन उद्यापासून रोजे सुरू राहणार आहे. चौदा तासांचा हा रोजा असणार आहे. चंद्रदर्शन घडल्यानंतर मुस्लिम समुदायाने एकमेकांना सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. या महीन्यात मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात दान व जकातच्या माध्यमातून गरजूंना मदत करत असते. बाजारपेठा इफ्तार व विविध वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी सजले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहे रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
What's Your Reaction?






