भावी उपमुख्यमंत्री संजय सिरसाट यांचे शहरात झळकले बॅनर...!
भावी उपमुख्यमंत्री संजय सिरसाट यांचे शहरात झळकले बॅनर...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिम मधून चौथ्यांदा निवडून येऊन विक्रम करणारे संजय सिरसाट भावी उपमुख्यमंत्री म्हणून शहरात बॅनर झळकले आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून ते प्रखरपणे माध्यमांवर शिवसेनेची भुमिका मांडत आहे. मागच्या वेळी मंत्रीपदाची संधी हुकली शेवटी सिडकोचे अध्यक्ष म्हणून त्यांची वर्णी लागली आता 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीत त्यांच्या समर्थकांनी शहरात भावी उपमुख्यमंत्री संजय सिरसाट यांचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. त्यांना मंत्रीपद तर नक्कीच मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याने गावी निघून गेले असल्याने उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत. शपथविधी मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडेल किंवा एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील किंवा नवीन चेह-याला संधी मिळेल हे अजून गुलदस्त्यातच आहे. संजय सिरसाट मत्री होतील की उपमुख्यमंत्री पद मिळेल हेही गुलदस्त्यात आहे जोपर्यंत निर्णय होत नाही
.
What's Your Reaction?