मंजूरपुरा रोशनगेट रस्त्याचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू

 0
मंजूरपुरा रोशनगेट रस्त्याचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू

मंजूरपुरा रोशनगेट रस्त्याचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू

शाहबजार निशानचे अतिक्रमण स्वतः काढून घेत दिला मानवतेचा संदेश...फुल विक्रेता, चहाची टपरी काढली...

औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) आज सुट्टीच्या दिवशी मंजूरपुरा ते रोशनगेट रस्ता रुंदीकरण डिपि रस्ता 50 फुट(15 मीटर) मध्ये रस्त्यावर बाधित मालमत्तेचे अतिक्रमण आजपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढण्याची कारवाई सुरू केली आहे.

अगोदर नगर विकास विभागाच्या वतीने मार्किंग करण्यात आली.

मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी रोशनगेट ते टाऊनहाॅल पर्यंत स्मार्ट सिटीच्या निधीतून सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणे असल्याने नेहमी वाहतूक कोंडी होते. आता अतिक्रमणे काढून लगेच रस्त्याचे कामाला सुरुवात होणार आहे.

आज सकाळी शहाबाजार येथील निशान पासून अतिक्रमण विभागाच्या वतीने कार्यवाही सुरू केली. अगोदर चहाचे दोन टप-या तीन फुल विक्रेत्यांच्या टप-या हटवण्यात आले. एक कलरची दुकान असल्याने एमआयएमचे युवा शहराध्यक्ष असरार अहेमद, वंचितचे तय्यब जफर व मतीन पटेल यांनी अतिरिक्त मनपा आयुक्त सौरभ जोशी यांना विनंती केली की दोन तीन दिवसात रमजानचा पवित्र महिना सुरु होत आहे. या रस्त्यावर बाजारपेठ असल्याने कार्यवाही ईद नंतर सुरू करावी अशी विनंती केली. एका दुकानाला दोन दिवसांची वेळ देण्यात आली. ऐतिहासिक निशानचे, मुतवल्ली, मुजावर व दर्गाचे  सेवेकरी यांनी स्वतः हुन अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. अतिक्रमण विभागाच्या वतीने निशानचे मिनार तूटू न देता व्यवस्थित काढले. आजपासून सुरू झालेली कारवाई सुरू राहणार आहे. काही मालमत्ताधारकांनी स्वतः आपल्या हाताने दुकानासमोरील टिन शेड, बोर्ड हटविले. निशानचे आठ ते दहा फुट हायमास पर्यंत अतिक्रमण जमिनदोस्त करण्यात आले. यावेळी मोठा जमाव जमला होता.

या रस्त्यावरील भुसंपादन झाले आहे. 1999 मध्ये बाधित मालमत्ताधारकांना मोबदला दिल्याची नोंद मनपा प्रशासनाकडे आहे. आजपासून पाडापाडीला सुरुवात झाली. एक मालमत्ता येथे अशी आहे त्यांनी मोबदला घेतला नाही व टीडीआर सुध्दा घेतलेले नाही मग हि मालमत्ता पाडणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पवित्र रमजान महिना सुरू होण्याच्या अगोदर मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. अतिक्रमण स्वतः काढून घेण्याचे आवाहन यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी यावेळी केले आहे.

सदरील कार्यवाही मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, मनपा उपायुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा आयुक्त नितीन मोरे, इमारत निरीक्षक मजहर अली नागरी मित्र पथकाचे व शहर वाहतूक शाखेचा कार्यवाहीत सहभाग

होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow