मंत्री अतुल सावे, महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत पदयात्रेला प्रतिसाद

 0
मंत्री अतुल सावे, महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत पदयात्रेला प्रतिसाद

पदयात्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद..

मंत्री अतुल सावे, महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांची उपस्थिती 

औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज )राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्व मतदार संघात काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी महायुतीचे उमेदवार तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उपस्थिती होती.

महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी पूर्व मतदार संघातील सिडको एन 6 भागात वाजत-गाजत काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा पूर्व मतदार संघाचे आमदार श्री अतुल सावे आणि महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचे औक्षण करून विजयाचे तिलक लावले. माता मंदिर मथुरा नगर चौक एन 6 येथून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित महायुतीच्या पदाधिकारी यांनी एकच बाण,धनुष्य बाण, मोदी मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. पूर्व मतदार संघातील नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या सोबत संवाद साधत या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन मंत्री श्री अतुल सावे यांनी यात्रेदरम्यान केले. या यात्रेचा समारोप आविष्कार चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत करण्यात आला.

या प्रसंगी शिवाजी दांडगे, राजेंद्र जंजाळ, सुमित खांबेकर, नितीन खरात, गणेश नावंदर, अरुण पालवे, अशोक वीरकर, राहुल खरात, नारायण सुरगुणीवार, अविनाश पवार, सौरभ तोतरे, गणेश जोशी, अनिल शिसोदे, मनीषा भन्साळी, नंदा पांडे, लक्ष्मी गायकवाड, सरिता घोडतूरे, विद्या गायकवाड, मयूर वंजारी, यांच्या सह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow