मतदार जनजागृतीसाठी सर्व घटकांची भुमिका महत्वाची - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
मतदार जनजागृतीसाठी सर्व घटकांची भुमिका महत्वाची - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मतदार जनजागृतीसाठी सर्व घटकांची भुमिका महत्त्वाची-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी...

औरंगाबाद,दि.11(डि-24 न्यूज) मतदानाची टक्केवारी वाढविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात गेल्या निवडणूकीत ६३ टक्के मतदान झाले होते. हे प्रमाण असमाधानकारक आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असून त्यासाठी समाजातील सर्व घटक, विविध सामाजिक संघटना, व्यक्तिंची भुमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, विविध विभागांचे प्रमुख आदी उपस्थित होते.

 मतदार जनजागृती उपक्रमासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. त्यासाठी SWEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation program) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याद्वारे मतदारांपर्यंत पोहोचणे, त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून सांगणे. मतदान केंद्रावर मतदार आल्यानंतर त्यास सहकार्य करणे, मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विविध सुविधा निर्माण करणे इ. उपाययोजना करण्यात येत आहेत. 

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, यासंदर्भात नवमतदारांमध्ये जागरुकता यावी म्हणून प्रत्येक महाविद्यालयात व्याख्याने आयोजित करा. मोहल्ला कमिट्या, विविध व्यापारी संस्था, सामाजिक संस्था, धर्मगुरु यांच्या मार्फत मतदारांना मतदानाचे आवाहन करणे, मतदानाचे महत्त्व समजावून सांगणे आदी उपक्रम राबवावे. त्यासाठी विविध प्रसार माध्यमांचा उपयोग करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow