मनपाच्या अतिक्रमण विभागाने 20 फुट बाय 20 महाकाय होर्डिंग पाडले, 3.5 टन लोखंड जप्त
 
                                 
 
एमआयटी कॉलेज ते महानुभाऊ आश्रम पर्यंत 64 अतिक्रमण निष्कासित...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद) दि.5(डि-24 न्यूज)- महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांचे आदेशानुसार व अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहूळे यांच्या उपस्थितीत आज दिनांक 5 जून रोजी एमआयटी कॉलेज ते महानुभाव चौक दक्षिण बाजू दरम्यान कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई मध्ये एकूण 64 बांधकामे निष्कशित करण्यात आली असून यामध्ये दुकाने, कंपाउंड भिंती, ओटे, मोठे बॅनर, टपऱ्या व दुकानासमोरील शेड इत्यादी निष्काशित करून जप्त करण्यात आले आहेत. तसेच एकूण 45 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
सदर कारवाईस सहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभाग सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्चना राजपूत, नगररचना विभागाचे अभियंता शिवाजी लोखंडे, सचिन कुमावत, इमारत निरीक्षक आश्विनी कोथळकर, कुणाल भोसले, शिवम घोडके, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, विद्युत विभागाचे लाईनमन यांत्रिकी विभागाचे जेसीबी चालक टिप्पर चालक इत्यादी उपस्थित होते.
20 फूट बाय 20 फुटचे महाकाय होर्डिंग पाडले...
सदरील कारवाईत 20 फूट बाय 20 फूटाचा महाकाय अनधिकृत होर्डिंग आज पाडण्यात आला. सदरील होर्डिंग सर्व्हिस रोड वर आले होता आणि त्यामुळे वाहतुकीस देखील अडचण निर्माण झाली होती.
संबंधित यांचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या होर्डिंग मधून साधारण 3.5 टन लोखंड जप्त करण्यात आले आहे. 
                        
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            