मनपातर्फे मुकुंदवाडीत स्वच्छता अभियान...!
 
                                मनपा तर्फे मुकुंदवाडीत स्वच्छता अभियान...
1 ते 15 ऑगस्ट दरम्यान जनजागृती करून राबविणार उपक्रम
छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.6(डि-24 न्यूज) महानगरपालिका तर्फे मंगळवारी (दि. 6) मुकुंदवाडी येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रभाग क्रमांक 6 अंतर्गत वॉर्ड क्रमांक 83 मुकूंदवाडी येथे वॉर्ड अधिकारी अर्जुन गिराम यांच्या मार्गदर्शनात मुख्य रस्ते झडाई करून रोडवरील कचरा संकलन केला. तसेच यावेळी नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली. हे अभियान 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. हम होंगे कामयाब अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली.
यावेळी अर्माड करिअर अकॅडमीचे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या स्वच्छता अभियानामध्ये मनपा कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक विकास भाले, कृष्णा विसपुते, रितेश सौदे, सचिन ठोकळ, जवान शिवसांब काळे, संजय वाघमारे, रवींद्र भालेराव, पंडित मगरे, संतोष भाले व आर्मड फोर्स अकॅडमी व मुकुंदवाडी गावातील जेष्ठ नागरिक व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            