मनसेचे अनिकेत निल्लावार यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

 0
मनसेचे अनिकेत निल्लावार यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

मनसेचे अनिकेत निल्लावार यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सहसचिव अनिकेत निल्लावार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिट्ठी देत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसहा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष अभिजित देशमुख, दिलीप चव्हाण, माजी नगरसेविका अंकिता विधाते, अनिल विधाते, नागेश भालेराव यांची उपस्थिती होती. त्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठे खिंडार पडले आहे. त्यांच्या प्रवेशाने जिल्ह्यातील पक्ष संघटन आणखी मजबूत होईल असा विश्वास यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी व्यक्त केला. पक्षाध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजिदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी काळात आणखी समर्थकांचे जाहीर प्रवेश होईल असे अनिकेत निल्लावार यांनी स्पष्ट केले.

यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश...

विक्की जाधव (शहर उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना), अजय कागडा (शहर उपाध्यक्ष), शिवा ठाकरे (विभाग अध्यक्ष), अक्षय हिवाळे (महाराष्ट्र सैनिक), अविनाश जाधव (महाराष्ट्र सैनिक), ऋतुपर्ण गायकवाड (शाखाध्यक्ष), अक्षय सोनवणे (महाराष्ट्र सैनिक), अभिषेक खंडागळे (महाराष्ट्र सैनिक).

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow