मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी महायुतीची एकजूट...!

 0
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी महायुतीची एकजूट...!

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आ. सतीशभाऊ चव्हाण यांच्या विजयासाठी कन्नड तालुक्यात महायुतीची एकजूट; विक्रमी मताधिक्याचा निर्धार!

कन्नड, दि.14(डि-24 न्यूज) - महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची नियोजन बैठक उत्साहात संपन्न; प्रचाराची रणनीती आखली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. श्री. सतीशभाऊ चव्हाण यांच्या विजयासाठी कन्नड तालुक्यात महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने कंबर कसली असून, त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याच अनुषंगाने आज कन्नड येथील शिक्षकांची पतसंस्था सभागृह, पिशोर रोड येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची नियोजन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रचाराची रणनीती आखण्यासह सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करून महायुतीचा विजय सुनिश्चित करण्याचा संकल्प केला.

सतीशभाऊंचा विजय ऐतिहासिक ठरणार : आमदार संजानाताई जाधव

बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार सौ. संजानाताई जाधव म्हणाल्या की, सतीशभाऊ चव्हाण यांच्या पाठीशी महायुतीची भक्कम ताकद उभी असल्याने यावेळचा त्यांचा विजय ऐतिहासिक ठरणार आहे. सभागृहात बेरोजगारांचे आणि पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी सतीशभाऊ नेहमीच अग्रेसर असतात. पक्षभेद न पाळता ते सर्वांना मदत करतात. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची कार्यपद्धती हीच त्यांची खरी ताकद आहे. मराठवाड्यात तालुका स्तरावर सर्वाधिक मतदान असलेल्या कन्नड तालुक्यातून सतीशभाऊंना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी माझ्या शिवसेनेचे कार्यकर्ते आघाडीवर राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सर्वांना सोबत घेऊन चालणे हेच सतीशभाऊंच्या यशाचे गमक : मा. आ. नितीन पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मा. आ. श्री. नितीन पाटील साहेब म्हणाले की, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची सतीशभाऊंची कार्यपद्धती हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. अजितदादांसारखेच मराठवाड्यात सतीशभाऊ हे काम करणारे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी तत्पर असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांना मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्यांचे आश्वासक नेतृत्व म्हणजे सतीशभाऊ : स्वातीताई कोल्हे

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्वातीताई कोल्हे म्हणाल्या की, सतीशभाऊ चव्हाण हे सर्वसामान्यांचे आश्वासक नेतृत्व आहे. मराठवाड्यातील 76 तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या या प्रचंड मोठ्या मतदारसंघातील कोणतीही व्यक्ती सतीशभाऊंना सहज भेटून आपल्या समस्या मांडू शकते. संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सहजपणे आणि निःस्वार्थ भावनेने मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे. जनसामान्यांशी असलेला थेट संपर्क, प्रश्न सोडविण्याची तत्परता आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती यामुळे सतीशभाऊंच्या विजयासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

या नियोजन बैठकीला आमदार सौ. संजानाताई जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मा. आ. श्री. नितीन पाटील साहेब, भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्री. सुभाषआबा काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. श्री. मनोज राठोड, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्वातीताई कोल्हे, राष्ट्रवादीचे नेते श्री. संतोषजी कोल्हे, संपर्क प्रमुख श्री. महेश उबाळे, श्री. प्रताप राठोड, पंचायत समिती उपसभापती सौ. मायाताई सुरासे, जि. प. सदस्य डॉ. दिलीपसिंग राजपूत, जि. प. सदस्य श्री. अर्जुन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती श्री. प्रकाशाअण्णा घुले, खरेदी-विक्री संघाचे सभापती श्री. ज्ञानेश्वर निकम, उपसभापती जयेश बोरसे, श्री. शेखनाथ चव्हाण, श्री. पुंडलीक राठोड, श्री. विकास जिवरख, श्री. शिवकुमार जैस्वाल, श्री. सुदाम राठोड, उपनगराध्यक्षा सौ. रंजनाताई राठोड, शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. राम पवार, पं. स. सदस्य श्री. अरविंद राठोड, पं. स. सदस्य श्री. सिद्धेश्वर झालटे, मा. पं. स. सदस्य किशोर पवार, श्री. आदित्य गर्जे, नगरसेवक श्री. संदीप घोंगटे, श्री. आकाश झिमन, श्री. शिवाजी नाना थेटे आणि श्री. रत्नाकर पंडित उपस्थित होते.

भाजपच्या वतीने नगरसेविका सौ. सोनालीताई बैनाडे, श्री. प्रकाश नागरे (तालुका सरचिटणीस), श्री. संजय श्रीकांत (नोंदणी संयोजक), श्री. गजानन आव्हाळे (नगरसेवक), श्री. सुधाकर देवकर (नगरसेवक), पं. स. सदस्य मुक्तार शहा, पं. स. सदस्य श्री. संतोष करवंदे, पं. स. सदस्य श्री. पांडु मेंगाळ, सौ. अर्चना पवार, सौ. राधाताई आव्हाळे (उपजिल्हाध्यक्षा, भाजप), सौ. सुनिताताई निंभोर (पश्चिम मंडळ, भाजप) आणि सौ. कोमलताई जैन (भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षा) यांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुका कार्याध्यक्ष श्री. मुकेश वेताळ, युवक तालुकाध्यक्ष आप्पा गायके, महिला तालुकाध्यक्ष सौ. निकिता पवार, सरचिटणीस सौ. शितल केडीया, महिला उपजिल्हाध्यक्ष सौ. स्वाती पवार, पं. स. सदस्य श्री. प्रवीण गोरे, श्री. मनोज आप्पा देशमुख, युवक उपजिल्हाध्यक्ष श्री. किरण थोरात, श्री. गणेश देशमुख सर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष नवाब सेठ, ओबीसी शहराध्यक्ष श्री. प्रकाश पातळे, श्री. विनायक चव्हाण, श्री. विक्रम चव्हाण, राष्ट्रवादी शिक्षक सेलचे श्री. अविनाश काळे, डॉ. श्री. प्रकाश चव्हाण, उपतालुकाध्यक्ष श्री. सुनील उर्फ बंधू जाधव, युवक उपतालुकाध्यक्ष श्री. प्रशांत वाघ, उपतालुकाध्यक्ष श्री. योगेश बाळासाहेब पवार, श्री. दीपक पवार, श्री. गीतराम दादा पवार, श्री. प्रदीप मनगटे, सामाजिक न्यायचे श्री. राहुल बहिरव, श्री. संदीप गायकवाड, साईमलिक दादेखाँ पठाण, गटनेते श्री. संतोष निकम, नगरसेवक श्री. युवराज बनकर, नगरसेवक श्री. बंटी काशिनंद, नगरसेविका सौ. वर्षाताई ताठे, नगरसेवक श्री. सुरेशभाऊ डोळस, नगरसेवक श्री. असलम पटेल, नगरसेवक श्री. राहुल वाघ, नगरसेवक श्री. आरेफ रॉक, नगरसेवक श्री. भरत जाधव, श्री. सोमनाथ डोळस, श्री. योगेश राजपूत, श्री. गहिनाथ काळे, श्री. नंदुसेठ, श्री. सुभाष शिरा, श्री. भाऊसाहेब गायके, श्री. सतीश गायके, श्री. चेतन लाड, श्री. शिवाजी मोतिंगे, श्री. काशिनाथ सुलताने, श्री. संजय पाटील सोन्ने, सोशल मीडिया प्रमुख चि. गौरव सुस्ते, चि. भूषण कोल्हे, श्री. सचिन खरे, श्री. संजय कवडे, श्री. सागर शिंदे, श्री. रावसाहेब शिंदे, श्री. कल्याण पवार, श्री. दीपक ताठे, श्री. अमोल पवार, श्री. रविंद्र राठोड, श्री. कल्याण जाधव, चि. सूर्या आगळे, मा. नगरसेवक श्री. दिलीप शिंदे, श्री. उद्धव पवार, अल्पसंख्याक शहराध्यक्ष शरीफ पठाण, मुन्ना पहेलवान, चि. सागर चव्हाण आणि श्री. मनोज जाधव उपस्थित होते.

याशिवाय श्री. संजय रिंढे, श्री. सुधाकर आप्पा पवार, श्री. टी. एस. कदम सर, श्री. उत्तमराव वाघ, श्री. बाबुलाल काळे आणि श्री. संतोष राजे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

 महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बैठकीचे संयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. कैलास (आबा) अकोलकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष श्री. नारायणशेठ बोडखे, भाजप मंडळ (पश्चिम) अध्यक्ष श्री. ललित सुराशे, भाजप मंडळ (मध्य) अध्यक्ष श्री. सुनील पवार आणि भाजप मंडळ (पूर्व) अध्यक्ष श्री. श्रीराम जंजाळ यांनी केले.

या बैठकीला महायुतीचे सर्व संबंधित पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय राखून प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबविणे, पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचणे आणि आ. सतीशभाऊ चव्हाण यांना कन्नड तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळवून देणे, या उद्देशाने बैठकीत एकजुटीचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow