मराठा आरक्षण, उपसमीतीची पुढची बैठक कधी वाचा या बातमीत...!

 0
मराठा आरक्षण, उपसमीतीची पुढची बैठक कधी वाचा या बातमीत...!

मराठा आरक्षण मंत्री मंडळ उपसमितीची एस इ बी सी आरक्षणा बाबत 21 रोजी महत्वाची बैठक होणार-राजेंद्र दाते पाटील

बुधवारी झाली उपसमीतीची बैठक...

मुंबई,दि.15 (डि-24 न्यूज): मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत गठीत

 करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री विश्राम गृह मुंबई येथे संपन्न झाली. उच्च न्यायालयातील एस इ बी सी आरक्षणा विरोधातील सुनावणी बाबत अनेक कायदेशीर व घटनात्मक मुद्दे उच्च व सर्वोच्च न्यायालयातील मुख्य हस्तक्षेप याचीकाकर्ता जेष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी सविस्तर पणे उपस्थित केल्यामुळे मराठा आरक्षणा मंत्री मंडळ उपसमितीची एस इ बी सी आरक्षणा बाबत दिनांक 21 ऑक्टोबर 2026 रोजी महत्वाची बैठक हस्तक्षेप याचिका कर्ते व विधिज्ञ यांचे उपस्थितीत राज्य शासन आयोजीत करणारआहे.

या बैठकीत सविस्तर पणे बोलतांना उच्च व सर्वोच्च न्यायालया तील मुख्य हस्तक्षेप याचीकाकर्ता जेष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील म्हणाले की,केजी ते पीजी पर्यंत मराठासमाजाला ओबीसी सारख्या सवलती साठी जी आर मध्ये दुरुस्ती आवश्यक असुन,मराठा समाजाला ओबीसी सारख्या सर्व सवलती के.जी. ते पी.जी. लेव्हल पर्यंत देतांना तांत्रिक, अतांत्रिक, वैद्यकीय शिक्षण, नोकरीतील नियुक्त्या बढती आदी सर्व सवलती लागु करून खाजगी विद्यापीठ, डिम्ड युनिवार्सिटी मध्ये सुद्धा ओ.बी.सी सारख्या सवलती द्याव्यात या मध्ये वयाची अट शिथिलता तर द्यावीच परंतु ओबीसी आणि मराठा समाजातील निर्माण झालेली स्थिती कायम स्वरूपी मिटवण्या साठी "अराजकीय आरक्षण " हा शब्द आणि वरील प्रमाणे दुरुस्ती करणारा सुधारीत शासनादेश तात्काळ निर्गमित करावे ही सुद्धा अंत्यन्त महत्वाची त्यांची गेली एक दशका पासूनची त्यांची मागणी असुन याच सोबत त्यांनी सारथीला पाच हजार कोटींचा निधी तर स्व. आण्णासाहेब पाटील महामंडळास दहा हजार कोटी निधी, रखडलेल्या नियुक्त्या,आंदोलन काळा तील गुन्हे वापस घेणे आदी मागण्या त्यांनी सविस्तर पणे मांडल्या.

त्यानुसार आता एसइबीसी न्यायालयीन प्रकारणासाठी हस्तक्षेप याचिकाकर्ता, विधिज्ञ व अधिकारी यांची बैठक 21 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार असुन मराठवाड्यातील आरक्षणा बाबत स्वतंत्र बैठक आयोजनाचे नियोजन होऊन इतर मागण्याची पूर्तता करण्यासाठी दर दोन महिन्यात एकदा मुंबईत बैठक घेण्याचे एक मताने ठरले आहे.

या बैठकीस मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य मंत्री गिरीश भाऊ महाजन, मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री नरेंद्र पाटील, आ.प्रसाद लाड, सारथीचे व स्व आण्णासाहेब पाटील महामंडळाचे कार्यकारी संचालक तसेच सारथीचे संचालक उमाकांत दांगट आदीनी मार्गदर्शन केले.

या महत्वाच्या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे, रमेश केरे पाटील, सुभाष जावळे, राजन घाग, मराठा क्रांती मोर्चा टीम मुंबईचे रामचंद्र शेडगे, अनिल सुर्वे, बाळा साहेब इंगळे, राजन घाग, रुपेश मांजरेकर, सदाशिव बानुगडे, संतोष शेजवळ, प्रशांत भोसले, मारुती देसाई, स्नेहा गावंकर, राकेशवासुदेव, पांडुरंग रोडे, सुभाष देसाई, दिनेश पवार, शैलेश शिंदे सुशील निकम, विवेक शिंदे, सूर्याजी सोनूवले, सुभाष पाटील, अंतोष कांबळे, रवींद्र शिंदे, मनोज पवार, संतोष दळवी, किशोर चव्हाण, प्रा.शिवानंद भानुसे, प्रफुल्ल पवार ,प्रा.रविंद्र बनसोड,विलास पांगरकर, करण गायकर, राजेंद्र चित्रे, परमेश्वर नलावडे,अंकुश कदम, रविंद्र काळे, सुनिल कोटकर,राहुल पाटील या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow