मलकापूर बँकेत 680 कोटींचा महाघोटाळा, संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची इम्तियाज जलील यांची मागणी

 0
मलकापूर बँकेत 680 कोटींचा महाघोटाळा, संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची इम्तियाज जलील यांची मागणी

मलकापूर बँकेत 680 कोटींचा महाघोटाळा, संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची इम्तियाज जलील यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) मलकापूर को-ऑप.बँक लि.या बँकेतील संचालक मंडळ, कर्मचारी, सीए व ऑडिटर्स यांनी संगनमताने अंदाजित 680 कोटी रुपयांचा आर्थिक महाघोटाळा व पैशांचा अपहार करुन ठेविदारांची आर्थिक फसवणूक केल्याने संबंधितांविरुद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करुन उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्त प्रविण पवार यांना शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.

चार ठेविदारांनी विविध पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे तरीही आतापर्यंत कारवाई झाली नाही.

जिल्ह्यातील वयोवृद्ध, निवृत्त कर्मचारी व इतर ठेविदारांनी आयुष्याची जमापुंजी या बँकेत ठेवली होती परंतु पतसंस्थेच्या संचालक मंडळ, कर्मचारी अधिकारी यांनी संगनमताने अंदाजित 680 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच अनेकांना ठेविदारांना तर आत्महत्या करण्यास प्रवृत्त सुध्दा केले असल्याचे निदर्शनास आले आहे. 

ठेविदारांना ठेवीची रक्कम परत मिळावी यासाठी ठेविदार संघर्ष कृती समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने अनेक आंदोलने व संबंधित विभागात वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही. ठेविदारांना हक्काचे रक्कम परत मिळत नसल्याने अनेक ठेविदारांची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे. पोलिस विभागाची कामाची गती व उदासिनता पाहून ठेविदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम बुडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संदर्भ क्रं.1 व 2 अन्वये आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करुन ठेवीची रक्कम परत मिळणे बाबत तक्रारदार(ठेविदार) यांनी पोलिस आयुक्त आणि पोलिस निरीक्षक उस्मानपुरा पोलिस स्टेशन यांच्याकडे अनुक्रमे दिनांक 14/12/24 आणि 16/2/25 रोजी सर्व कागदपत्रासह रितसर तक्रार अर्ज दाखल केला होता. परंतु तीन महीन्याहुन जास्त कालावधी होऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई अथवा पत्रव्यवहार करण्यात आले नसल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली नाही तर कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा ठेविदारांनी दिला आहे.

याप्रसंगी पंकज साखला, संजय गुप्ता, कुंज बिहारी अग्रवाल, रणधिर सिंग चांडोक, निखिल मित्तल, मनिषा पिंपळे, रीना जैन, रमेश राजपूत, एस.एस.ढाले, ओंकारी मैडम यांच्यासह मलकापूर कोऑप बँकेचे ठेविदार मोठ्या संख्येने उपस्थित हो

ते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow