महाकुंभ मेळाला जाण्याकरिता विशेष रेल्वे गाडी

 0
महाकुंभ मेळाला जाण्याकरिता विशेष रेल्वे गाडी

महाकुंभ मेळाला जाण्याकरीता विशेष रेल्वे

नांदेड,दि.23(डि-24 न्यूज) प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील कुंभ मेळा ला जाण्याकरीता नांदेड-पटणा-नांदेड विशेष रेल्वे प्रयागराज चौकी आणि काचीगुड-पटणा-काचीगुडा नांदेड आणि प्रयागराज चौकी मार्गे चालविण्यात येत आहेत – 

 गाडी क्रमांक 07721 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी रात्री 23.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. 

गाडी क्रमांक 07722 पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील. 

गाडी क्रमांक 07725 काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी दुपारी 16:45 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. 

गाडी क्रमांक 07726 पटणा ते काचीगुडा मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे सकाळी 07:00 वाजता पोहोचेल. 

या गाडीत 20 डब्बे असतील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow