महागाईमुळे अपक्ष उमेदवाराने उंटावरून बसून भरला उमेदवारी अर्ज
 
                                महागाईचा भस्मासुर असल्याने अपक्ष उमेदवाराने उंटावरून मिरवणूक काढून भरला अर्ज, उंटावरून उमेदवार अर्ज भरण्यासाठी जाताना साहेबखान पठाण यांनी जनतेला हात उंचावून आशिर्वाद मागितला... जागोजागी त्यांचे सत्कार करण्यात आला.
औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) देशातील जनता महागाईच्या चटक्याने त्रस्त झाले आहेत. पेट्रोलचे दर शंभरी पार गेले गॅस सिलिंडरचे दर आवाक्याबाहेर गेले असल्याने शहर व ग्रामीणनची जनतेचे हाल सुरू आहे तरीही या सरकारला दहा वर्षांत महागाई कमी करता आली नाही. विविध पक्षांचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी अनेक फोर व्हीलर व ताफा घेऊन येतात तो इंधनाचा खर्च वाचवण्यासाठी व आज हनुमान जयंती असल्याने गाजावाजा न करता उंटावरून बसून साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज जनतेच्या आग्रहाखातर दाखल केला आहे. मला निवडणूक दिले तर शहर स्मार्ट सिटी झाले तरी जिल्हा स्मार्ट करण्याचा प्रयत्न करु. गावागावात छोटे तळे बनवून पाण्याचा प्रश्न नेहमीसाठी सोडविणार, शहराच्या पाण्याचा प्रश्न नवीन पाइपलाइनच्या कामाला गती देऊन लवकर सोडवले जाईल. बेरोजगारी संपवण्यासाठी नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करु. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, मुस्लिम, मराठा, धनगर समाजाचे आरक्षणाचे प्रश्न सोडवणार असल्याचे माध्यमांशी संवाद साधताना आश्वासन दिले. पत्रकारांनी प्रश्न विचारला की आपण मतांचे विभाजन करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. एमआयएमला नुकसान होईल याबाबत उत्तर देताना त्यांनी सांगितले मला जनतेने उभे केले मी जनतेचा उमेदवार आहे. निवडणूक लढण्याची एमआयएमची मक्तेदारी आहे का. लोकशाहीमध्ये सर्वांना उभे राहण्याचा अधिकार आहे त्याचे मी पालन करत आहे. अपक्ष उमेदवार साहेबखान पठाण यांनी आज सकाळी किराडपूरा येथील राम मंदिरात समोरुन उंटावरून बसून गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले. किराडपूरा, रोशनगेट मार्गे चंपाचौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मिरवणूक काढली. यावेळी त्यांचे समर्थक उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            